रत्नागिरी : सचिन वाझे प्रकरणावरुन आता विरोधक आक्रमक झाले आहेत (BJP Leader Prasad Lad Criticize Home Minister). या प्रकरणी भाजपने राज्याच्या गृहमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांचं तोंड काळं झालंय. त्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत केलीय (BJP Leader Prasad Lad Criticize Home Minister Anil Deshmukh About Sachin Vaze Case).
“या प्रकरणामध्ये 2 डीसीपी आणि एक एडीशनल कमिशनर यांचा संबंध असल्याची चर्चा चालू आहे. त्यामुळे हे डीसीपी कोण, याचा देखील खुलासा सरकारने तात्काळ करायला पाहिजे, असं प्रसाद लाड यावेळी म्हणाले. अनिल देशमुख यांनी जर चांगल्या पद्धतीने काम केलं असतं, तर सचिन वाझेला अटक करायची गरज लागली नसती”, असं लाड यावेळी म्हणाले.
“सचिन वाझे हा एक गुन्हेगार आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्कॉर्पिओ गाडी सापडली होती, ती गाडी सचिन वाझे यांनी ठेवली असल्याचं त्यांनी कबुल केलं आहे. तसेच, जी दुसरी इनोव्हा गाडी होती, ती गाडी देखील पोलिसांचीच होती. याचा अर्थ असा होतो की, मुंबई पोलिसांनी साठलोठं करुन, मुंबई पोलिसांनीच दहशतवादी कृत्य केलंय, हे समोर येतं”, असंही ते म्हणाले.
“त्यामुळे ज्या खात्याचे मंत्री, तसेच सचिन वाझेच्या निलंबनाची गरज नाही, असं जे गृहमंत्री म्हणत होते, त्या गृहमंत्र्यांचं तोंड आता काळं झालं आहे. त्यामुळे याची नैतिक जबाबदारी घेऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला पाहिजे”, असं प्रसाद लाड यावेळी म्हणाले.
“सचिन वाझे प्रकरणानंतर महाविकास आघाडीच्या बैठकांवरुनही प्रसाद लाड यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटे काढले. महाविकास आघाडीच्या बैठका म्हणजे आता बळीचा बकरा कुणालाा करावं, याची स्ट्रॅटर्जी केली जातेय. शरद पवार यांच्यावर सचिन वाझे प्रकरणात शिवसेनेचा दबाव आहे. जयंत पाटील यांच्या उत्तरावर आम्ही समाधानी नाहीत. सचिन वाझे प्रकरणात सरकारनेच पाठिशी घातले, मुख्यमंत्री म्हणाले सचिन वाझे ओसामाबीन लादेन आहेत का?, तो त्यांच्या स्वप्नातील ओसामाबीन लादेन आहे का, जो अटक झाला. त्यामुळे सचिन वाझेबद्दलचे मुख्यमंत्र्यांचे उद्गार खेदजन आहेत”, असंही ते म्हणाले (BJP Leader Prasad Lad Criticize Home Minister Anil Deshmukh About Sachin Vaze Case).
“सुरुवातीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे की कोणत्याही गोष्टींमध्ये चौकशी झाली पाहिजे. चौकशीनंतर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यात कोणालाही पाठिशी घालण्याचे महाविकासआघाडी सरकारचे काहीही कारण नाही. सरकार तसं अजिबात होऊ करणार नाही. NIA आणि ATS अशा दोन यंत्रणा याप्रकरणी चौकशी करत आहेत. ज्या घटना पुढे येतात, त्यानुसार कारवाई करण्यात येईल,” असे अजित पवारांनी स्पष्ट केले.
“महाविकासआघाडीचे सरकार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी मिळून केलं आहे. त्यात महाराष्ट्राची कायदा आणि सुवव्यवस्था चांगली असली पाहिजे. त्यात कोणालाही पाठिशी घालण्याचे कारण नाही. कोणकोणत्या पक्षात होतं किंवा नव्हतं हा त्याचा प्रश्न आहे,” असेही अजित पवार म्हणाले.
सचिन वाझेप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रियाhttps://t.co/JbdtBuhjBS #SachinVaze #SachinWaze #AjitPawar @AjitPawarSpeaks
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 16, 2021
BJP Leader Prasad Lad Criticize Home Minister Anil Deshmukh About Sachin Vaze Case
संबंधित बातम्या :
सचिन वाझेंनीच स्वत:च्या सोसायटीमधील CCTV फुटेज गायब केले; NIAचा संशय