पुणे : भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे यांची भेट घेतली. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर पुण्यात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणाप्रमाणेच धनगर आरक्षणाच्या प्रश्नातही उदयनराजे यांनी लक्ष घालावे, अशी विनंती राम शिंदे यांनी यावेळी केली. माध्यमांना टाळत उदयनराजे यांनी राम शिंदेंना भेट दिली. (BJP Leader Ram Shinde meets MP Chhatrapati Udayanraje discuss Dhangar Reservation)
‘धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात काल (शनिवारी) माझी नियोजित बैठक खासदार छत्रपती उदयनराजे महाराज यांच्यासोबत झाली. रात्री त्यांना भेटलो, तेव्हा धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत विस्तृत आणि तपशीलवार चर्चा झाली’ अशी माहिती राम शिंदे यांनी दिली.
‘धनगर समाजाचा लढा अनेक दिवस चालू आहे. समाजाला आरक्षण मिळत नाहीये. घटनेमध्ये तरतूद आहे, अशा अनेक गोष्टींवर चांगल्या पद्धतीने चर्चा झाली. उदयनराजेंनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आपल्या लढ्याला माझा पाठिंबा असल्याचं आश्वासित केल्याचं राम शिंदेंनी सांगितलं. ‘मला धनगर समाजाविषयी माहिती आहे, त्यामुळे धनगर समजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशी भूमिका उदयनराजेंनी घेतली’ अशी माहितीही राम शिंदे यांनी दिली.
‘छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून उदयनराजे यांनी या राज्याला आणि देशाला दिशा देण्याचं काम केलं. सर्व पीडित आणि वंचितांना न्याय देण्याची भूमिका घेतली. म्हणून मी त्यांची भेट घेतली आणि त्यांना सकारात्मक भूमिका घेतली आहे’ असेही शिंदेंनी स्पष्ट केले.
भविष्यात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटणार आहे. हा लढा सर्वंकष व्हावा, कोणत्याही व्यक्तीचा किंवा पक्षाचा लढा न राहता समाजाचा लढा व्हावा, अशी भूमिका आपण पुढील काळात घेणार असल्याचंही राम शिंदे यांनी सांगितलं.
मराठा आरक्षण नेतृत्वासाठी मेटेंचा उदयनराजेंना आग्रह
मराठा आरक्षणविषयी लढ्याचे नेतृत्त्व खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी करावे, अशी लेखी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. तसंच “जगात छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला वंदनीय आहेत, पूजनीय आहेत. त्यांचे 13 वे वंशज छत्रपती उदयनजी महाराज यांनी पुढाकार घ्यावा. मराठा समाजासाठी काम करणाऱ्या संघटनांना उदयनराजे भोसले यांनी एकत्र करावे. मराठा समाजाचे सारथी, बलिदानांना न्याय मिळण्यासाठी नियोजन करावं, पुढची भूमिका ठरवावी आणि ते लवकरात लवकर करावे” असा आग्रह शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंनी केला होता. (BJP Leader Ram Shinde meets MP Chhatrapati Udayanraje discuss Dhangar Reservation)
“गुणवत्तेनुसार आरक्षण द्या”
दुसरीकडे, मराठा आरक्षण देता येत नसेल तर सगळंच आरक्षण रद्द करा आणि गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, अशी मागणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काल केली होती. मराठा समाजातील मुलांना चांगले गुण मिळूनही अॅडमिशन मिळत नाही, मात्र इतर समाजात कमी गुण असतानाही प्रवेश मिळतो. देवाने प्रत्येकाला बुद्धी दिली, आहे त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करुन, मार्क असूनही अॅडमिशन न मिळाल्यामुळे मराठा समाजातील अनेक मुलांना नैराश्य येत आहे, अशी खंत उदयनराजे यांनी व्यक्त केली.
Beed | बीडमधील मराठा तरुणाची सुसाईड नोट बनावट, हस्ताक्षर तरुणाचं नसल्याचा पोलिसांचा दावा – TV9 #BEED #Suicide #Maratha #Marathareservation #police pic.twitter.com/FgwGKg0Ovv
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 4, 2020
संबंधित बातम्या :
उदयनराजेंच्या बहिणीच्या आग्रहानंतर संभाजीराजे भेटीला, नाशकात मनिषाराजेंची सदिच्छा भेट
Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजेंकडून मोदींना पत्र, भेटीची मागणी
(BJP Leader Ram Shinde meets MP Chhatrapati Udayanraje discuss Dhangar Reservation)