नवी दिल्लीः भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील नेते तसेच बिहार सरकारमध्ये मंत्रीपद भूषवलेले शहानवाज हुसैन (Shahnawaz Hussain) यांना कोर्टाने झटका दिलाय. शहानवाज हुसैन यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करा, असे आदेश दिल्ली हायकोर्टाने (Delhi Highcourt) दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयात काही वर्षांपूर्वी दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने पोलिसांना (Delhi Police) हे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणी 3 महिन्यात तपास पूर्ण करण्याच्या सूचनाही कोर्टाने दिल्या आहेत. दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती आशा मेनन यांच्या बेंचने शहानवाज हुसैन यांच्याविरोधात बलात्कारासह अन्य कलामाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पीडित महिलेने काही वर्षांपूर्वी केलेल्या तक्रारीनंतर कोर्टाच्या आदेशानंतर आता शहानवाज हुसैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
दिल्लीत राहणाऱ्या एका महिलेने जानेवारी 2018 मध्ये कनिष्ठ न्यायालयात शहानवाज हुसैन यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची याचिका दाखल केली होती. शहानवाज हुसैन यांनी छतरपूर येथील फार्म हाऊसवर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी तक्रार पीडितेने केली होती. मात्र कनिष्ठ न्यायालयात पोलिसांनी एक अहवाल सादर केला होता. त्यानुसार, शहानवाज हुसैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करता येणार नाही, असे म्हटले होते. पण कोर्टाने पोलिसांचा तर्क रद्द करत जुलै 2018 मध्ये शहानवाज हुसैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात भाजप नेत्यांनी हायकोर्टात आव्हान दिले होते. मात्र आता दिल्ली हायकोर्टानेच शहानवाज हुसैन यांना झटका दिलाय. न्यायमूर्ती आशा मेनन निकालात म्हणाल्या, या प्रकरणी प्राथमिक प्रक्रिया करण्यास पोलिसांची इच्छा दिसत नाहीये. पोलिसांकडून कनिष्ठ न्यायालयात सादर केलेल्या अहवालात अंतिम अहवाल नव्हता. पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी अंतिम रिपोर्ट देण्याची गरज आहे. तसेच या प्रकरणी एफआयआर दाखल झाला पाहिजे व कलम 173 सीआरपीसी अंतर्गत अंतिम रिपोर्ट दाखल झाला पाहिजे, असे आदेश कोर्टाने दिलेत.
The #DelhiHighCourt has ordered registration of FIR against BJP leader Syed Shahnawaz Hussain in an alleged 2018 rape case observing that there was a complete reluctance on the part of city police to register the same.
Read more: https://t.co/VMrmcJ1IWj#SyedShahnawazHussain pic.twitter.com/BhUy1RWJQ1— Live Law (@LiveLawIndia) August 18, 2022
शहानवाज हुसैन हे बिहार विधान परिषदेचे आमदार आहेत. जदयू-भाजप युतीच्या सरकारमध्ये ते मंत्रीही होते. यापूर्वी ते तीन वेळा खासदार होते. 1999 मध्ये ते किशनगंजचे खासदार होते. 2004 मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2006 मध्ये भागलपूर येथे पोटनिवडणुकीत विजयी झाले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते पराभूत झाले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात ते मंत्री हेते.