कल्याण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बोलताना हिंदुत्त्वाच्या मुद्यावर भाष्य केलं. मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीत तर हनुमान चालिसा डबल आवाजात लावू, असं राज ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरे यांच्या भाषणावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे. मात्र, भाजप नेत्यांकडून राज ठाकरे यांच्या भाषणाचं स्वागत करण्यात आलं आहे. केंद्रीय सूक्ष्म व लघू उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राज ठाकरे यांचं कौतुक केलं.तर, राज ठाकरे हिंदुत्वासाठी अनुकूल राहिले आहेत पुन्हा हिंदुत्वावर भर दिला असेल तर हिंदुत्वाच्या भल्यासाठीच आहे, असं भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले. राज ठाकरे यांची भूमिका पहिल्यापासून हिंदुत्वासाठी अनुकूल राहिलेली आहे ,त्यानी हिंदुत्वावर भर दिला असेल तर हिंदुत्वाच्या भल्यासाठीच आहे असं विधान भाजपने नेते विनय सहस्त्रबुद्धे यानी केलं आहे.
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारचा पंचनामा केला. महाराष्ट्रातील वास्तववादी चित्र त्यांनी सांगितले, हे काही जणांना झोंबले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. ज्यांनी आयुष्यभर स्वार्थी, सोयीने सत्ता मिळवली त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया द्यावी, हे ही एक आश्चर्य आहे. 2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी गद्दारी केली त्याहीपेक्षा मोठी गद्दारी हिंदुत्वाशी आहे. पदासाठी, पैशासाठी गद्दारी करणाऱ्यांनी राज ठाकरेंना कितीही उत्तर दिले असले, तरी ‘गद्दारी ती गद्दारीच’. हे निष्ठेचे राजकारण नाही, हे पद आणि सत्तेसाठीचे राजकारण आहे, अशी टीका काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवर करत नारायण राणे यांनी राज ठाकरे यांची बाजू घेतलीय.
मशिदीवरील भोंग्या संदर्भात राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाबाबत बोलताना खऱ्या अर्थाने सलोखा आणि सामंजस्य नांदायाचे असेल तर कुणालाही विशेष अधिकार देता कामा नये या अर्थाने या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे, असं विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले. राज ठाकरे भाजप समर्थनार्थ बोलत असल्याची चर्चा आहे. याबाबत बोलताना सहस्त्रबुद्धे यांनी एकमेकाना अशा प्रकारची लेबल लावली जातात.ते राजकीय नेते आहेत ते एका पक्षाचे प्रमुख आहेत,ते त्यांचा मार्ग निवडतील अटकळबाजीच्या माध्यमातून पतंग उडवण्याला काही अर्थ नाही विनय सहस्त्रबुद्धे
इतर बातम्या:
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भेटीला नितीन गडकरी, “शिवतीर्थ”वरील भेटीत युतीची चर्चा?
Jitendra Avhad : कोरोना विचित्र असला तरी त्याने मानवी नातेसंबंधातील संवाद घडविला : जितेंद्र आव्हाड