अहमदनगर : भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर (Radhakrishna Vikhe Patil Criticize Thackeray Government) पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. राज्यात ‘सरकार’ नावाची व्यवस्था कुठे आहे. केवळ इव्हेंट मॅनेजमेंट सुरु असल्याचा घणाघाती आरोप विखे पाटलांनी केला आहे (Radhakrishna Vikhe Patil Criticize Thackeray Government).
“सरकार काय करत आहे, हे त्यांना माहित नाही. केवळ मोठमोठे दावे केले जात आहेत. कोरोनासाठी मोठे हॉस्पिटल उभारल्याचे केवळ दावे उद्धव ठाकरे सरकारने केले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. प्रत्येक मंत्री संस्थानिक आहे. मात्र, जनतेसाठी काहीही करण्याची त्यांची भूमिकाच नाही”, अशा शब्दांत विखे पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आणि उच्च आणि तंत्रशिक्षण राज्य मंत्री प्राजक्त तनपुरेंसह राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
शिर्डीतील साईबाबा मंदिर अद्याप बंद आहे. शहरातील सर्व आर्थिक व्यवहार मंदिरावर अवलंबून आहेत. शिर्डी संस्थान कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपण कोर्टात जाणार असल्याचा इशारा विखे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. संस्थानच्या निर्णयाविरोधात कर्मचारी काळ्या फिती लावून काम करतील. तसेच, सध्या जिल्हा न्यायाधिश संस्थानचा कारभार बघत आहेत. अध्यक्षांनी मागण्या मान्य न केल्यास जिल्हा न्यायालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा देखील विखे पाटलांनी दिला आहे (Radhakrishna Vikhe Patil Criticize Thackeray Government).
“अनेक वर्षांपासून शिर्डी संस्थानच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केलं जावं. पगार कपातीचा निर्णय मागे घ्यावा, ही मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. अनेकदा मागणी करुनही संस्थानच्या अध्यक्षांनी दुर्लक्ष केलं. संस्थानच्या अध्यक्षांना काम करायला वेळ नसेल तर पदावरुन दूर व्हा”, असं म्हणत विखे पाटील यांनी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे.
“विधानसभेचे अधिवेशन जास्त दिवस चालले, तर आमदारांचा उद्रेक बाहेर येईल. महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे, त्यामुळे हे अधिवेशन दोन दिवसांत गुंडाळले जाणार”, असंही विखे पाटील म्हणाले.
उद्धवजी, राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवूया, कोरोनाविरोधात एकत्र येऊया, चंद्रकांत पाटलांचे पत्र https://t.co/4dGtoYFjIy @ChDadaPatil @OfficeofUT
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 6, 2020
Radhakrishna Vikhe Patil Criticize Thackeray Government
संबंधित बातम्या :
‘एकनाथ खडसे यांनी शिवसेनेत यावं’, अब्दुल सत्तार यांची खुली ऑफर