पाटणा: भाजपने लोकसभा निवडणूक 2019 साठी जागावाटप सुरु केलं आहे. बिहारपासून भाजपने जागा वाटपांचा तिढा सोडवण्यास सुरुवात केली. देशभरातील सध्याचं चित्र पाहता, भाजपने एक पाऊल मागे घेणंच पसंत केल्याचं बिहारच्या जागावाटपावरुन दिसून येतं. भाजपप्रणित एनडीएने काल नवी दिल्लीत आयोजित बैठकीत जागावाटप जाहीर केले. नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड, भारतीय जनता पक्ष आणि लोक जनशक्ती पक्ष यांची बिहारमध्ये युती असून, त्यांनी बिहारमधील एकूण जागांवर कोण किती जागा लढणार हे जाहीर केलं.
बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत. त्यापैकी भाजप 17, नितीश कुमारांची जदयू 17 आणि रामविलास पासवान यांचा लोजप 6 जागा लढणार असल्याचं जाहीर केलं. मात्र भाजपने निवडणुकीपूर्वीच 5 जागा गमावल्या. कारण भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 22 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आता 2019 च्या निवडणुकीत भाजप 22 जागाही लढणार नाही, म्हणजेच 5 जागा भाजपने गमावल्या. भाजप कोणत्या 5 खासदारांचं तिकीट कापून त्या जागा मित्रपक्षांना देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दुसरीकडे गेल्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला केवळ 2 जागाच जिंकता आल्या होत्या. तरीही त्यांना भाजपने समान म्हणजे 17 जागा बहाल केल्या आहेत. तर रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने सहा जागा जिंकल्या होत्या, त्या कायम ठेवण्यात आल्या आहेत.
2019 च्या लोकसभेला बिहारमध्ये कोण किती जागा लढवणार?
तर लोकशक्ती जनता पार्टीचे सर्वेसर्वा रामविलास पासवान यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, असे या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.
2014 साली बिहारमध्ये कुणाला किती जागा मिळाल्या होत्या?
संबंधित बातम्या