जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) चर्चेत आले आहे. त्यांनी जालन्यात मुख्यमंत्रीपदाला (Maharashtra CM) घेऊन महत्त्वाचं विधान केलंय. या विधानाचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. मी ब्राम्हणाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाहू इच्छितो, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. ते जालन्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे आता नवा वाद छेडला जाण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी दानवेंच्या विधानावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून, आता हा विषय गाजण्याची चिन्ह आहेत. ‘केवळ ब्राम्हणाला नगरसेवक किवा नगरअध्यक्ष म्हणून पाहू इच्छित नाही. मी ब्राम्हणाला या राज्याच मुख्यमंत्री पाहू इच्छितो’ असं वक्तव्य दानवे यांनी केलंय. जालन्यात (Jalna Raosaheb Danve Video) परशुराम जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना रावसाहेब दानवे यांनी हे विधान केलेलं होतं. नेहमीच आपल्या वेगवेगळ्या आणि वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असलेल्या रावसाहेब दानवेंचं मुख्यमंत्रीपदाबाबतचं विधानानं पुन्हा चर्चांना उधाणा आलंय.
अनेकदा राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांचा विपर्यास केला जात असल्याचा आरोप केला जातो. त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतचं वक्तव्य करताना नेमका कोणत्या संदर्भानं हा उल्लेख केला? त्याच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय होते, याचीही चर्चा होणं गरजेचं आहे. रावसाहेब दानवेंनी केलेलं नेमकं विधान काय होते, हे त्यामुळेच जाणून घेणं गरजेचं आहे. रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय, की…
मला दिल्लीला जायचंय. उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. आणि एकच विमान असल्यामुळे मला जायतंय. मी सर्वप्रथम आपल्याला भगवान परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि सुनिल किणगावकर यांनाही शुभेच्छा देतो, की एवढ्या सगळ्यांनी समाजबांधवांनी या वयात तुमच्यावर विश्वास व्यक्त केला.
मला असं वाटलं की भावनेच्या भरात तुम्ही रियाटरमेंटची घोषणा करता की काय.. परंतु पुन्हा नगरपालिकेची निवडणुका आल्या. आमच्याकडे लक्ष ठेवा. कोणत्या एका पक्षानं होत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी ब्राम्हणांना प्रतिनिधित्व द्या. आणि एका पेक्षा जास्त ब्राम्हण जालना नगरपालिकेत निवडून द्या, असा आपल्या बोलण्याचा अर्थ होता.
सुनिल किणगावकर, ही विनंती मला लागू होत नाही. कारण मी केवळ ब्राम्हणाला नगरसेवक किवा नगराध्यक्ष म्हणून पाहू इच्छित नाही. मी ब्राम्हणाला या राज्याच मुख्यमंत्री पाहू इच्छितो..
(टाळ्या आणि जय परशुरामची घोषणा… )
(दानवे हसतात.) त्याच्यामुळं मी काही एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टीत पडणार नाही. पण एक गोष्ट खरी आहे. समाज कोणताही असो. आपण आता पाहिलं की आता पाच राज्यांच्या निवडणुका जाल्या. मी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये प्रचाराला गेलो होतो. जातीपातीच्या राजकारणाचं लोण आता बरंच वाढलंय.
महाराष्ट्रात आतापर्यंत दोन वेळाला ब्राम्हण समाजातील व्यक्तीला राज्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. 2014 साली देवेंद्र फडणवीस आणि मनोहर जोशी यांना 1995 साली महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळालं होतं. दरम्यान, आता महाविकास आघाडीचं सरकार राज्यात असताना रावसाहेब दानवे यांनी केलेलं विधान आता पुन्हा चर्चेत आलंय. दानवेंच्या या विधानावर अजित पवारांनीही प्रतिक्रिया देत काय म्हटलंय, पाहा..