भाजप आमदार नागपुरात संघाच्या ‘शाळे’त, नितेश राणे, विखे, गणेश नाईकही हजर

| Updated on: Dec 18, 2019 | 8:57 AM

भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही सतीश आणि महानगर सरसंघचालक श्रीधरराव गाडगीळ भाजप आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.

भाजप आमदार नागपुरात संघाच्या शाळेत, नितेश राणे, विखे, गणेश नाईकही हजर
Follow us on

नागपूर : भाजप आमदारांची आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ‘शाळा’ घेतली जाणार आहे. हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात असलेले भाजपचे दोन्ही सभागृहातील आमदार स्मृती भवनमधील संघ अभ्यास वर्गाला हजेरी लावणार आहेत. यामध्ये नितेश राणे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक यासारख्या ‘आयात’ नेत्यांचाही समावेश (BJP MLA at RSS Smruti Bhavan) आहे.

विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदार या वर्गाला उपस्थित राहणार आहेत, परंतु बऱ्याचशा आमदारांनी बैठकीला दांडी मारल्याचं चित्र आहे. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांचा अभ्यास वर्ग दरवर्षी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात आयोजित करण्यात येतो. त्यानुसार यंदाही सर्व आमदार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अभ्यासवर्गाला हजेरी लावत आहेत.

भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही सतीश आणि महानगर सरसंघचालक श्रीधरराव गाडगीळ भाजप आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रविण दरेकर, बबनराव लोणीकर यासारख्या आमदारांनी सकाळी लवकर उपस्थिती लावली. आद्यसरसंघचालक डॉ. हेडगेवार यांना आमदारांनी अभिवादन केलं.

आधी शरद पवार नागपुरात, आता खडसेही येणार, मोठा निर्णय जाहीर करणार?

दरम्यान, संघाशी कोणताही संबंध नसणाऱ्या नवनिर्वाचित भाजप आमदारांना संघाची ओळखदेखील करुन देण्याचा हा प्रयत्न आहे. संघाच्या वर्गाची उत्सुकता असल्याची भावना राधाकृष्ण विखे पाटलांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना व्यक्त केली आहे. तर संघाचे विचार समजून समाजासाठी काम करायचं आहे असं आमदार राम सातपुते यांनी म्हटलं आहे.

संघ विचारसरणीशी मी आधी परिचित होतो, या स्मृती भवन परिसरात आल्यावर समाधान वाटतंय, महान नेत्यांच्या आठवणी इथे आहेत, आधीही माझी हीच विचारसरणी होती, अशी भावना आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त (BJP MLA at RSS Smruti Bhavan) केली.