अकोला महानगरपालिकेत सत्ताधारी आमदाराचा ‘लेटर बॉम्ब’, भाजपच्या नगरसेवकांना हादरा

| Updated on: Sep 01, 2021 | 4:04 PM

मनपाच्या महासभेत मंगळवारी (31 ऑगस्ट) आमदार गोवर्धन शर्मा यांनी लेटर बॉम्ब टाकलाय. या पत्राने सत्तारुढ भाजपची निष्क्रियता समोर आली. आमदार शर्मा यांनी त्यांच्या पत्रात त्यांच्या निधीतून दिलेल्या रुग्णवाहिकेची देखभाल मनपा करु शकत नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते साजीद खान पठाण यांनी केला.

अकोला महानगरपालिकेत सत्ताधारी आमदाराचा लेटर बॉम्ब, भाजपच्या नगरसेवकांना हादरा
Follow us on

अकोला : अकोला मनपाच्या महासभेत मंगळवारी (31 ऑगस्ट) आमदार गोवर्धन शर्मा यांनी लेटर बॉम्ब टाकलाय. या पत्राने सत्तारुढ भाजपची निष्क्रियता समोर आली. आमदार शर्मा यांनी त्यांच्या पत्रात त्यांच्या निधीतून दिलेल्या रुग्णवाहिकेची देखभाल मनपा करु शकत नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते साजीद खान पठाण यांनी केला. या पत्राने 5 वर्षांपासून सत्तेतील भाजपची पोलखोल झाली आहे. रुग्णवाहिका सत्तारुढ पक्षाद्वारे जपली जात नसल्याची खंत विरोधी पक्षनेते साजीद खान यांनी व्यक्त केलीय.

भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी कोरोना संकटात उपलब्ध करुन दिलेल्या रुग्णवाहिकेबद्दल विरोधी पक्षनेते साजीद खान पठाण यांनी त्यांचे आभार मानले. त्यांनी जपलेल्या मानवी मुल्यांचे कौतुक साजीद खान पठाण यांनी केले, पण मनपाने दिलेल्या रुग्णवाहिकेची देखभाल करु शकत नसल्याचे आमदार शर्मा यांनी त्यांच्या पत्रात लिहिले.

पत्रात नेमकं काय म्हटलंय?

पत्रात म्हटले आहे, “अकोला मनपाला 20 लाख रूपये खर्च करून रुग्णवाहिका दिली. परंतू, वाईट अनुभव आला. ती रुग्णवाहिका कोणाच्याही कामात आली नाही.” रुग्णवाहिका पडून राहिली असल्याने ‘सत्तारुढ भाजपच्या नगरसेवकांचा तीळपापड झालाय. भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी मूर्तिजापूर येथे ही रुग्णवाहिका देण्याचे पत्र दिले होते.

आमदार शर्मा हे आता मूर्तिजापुरात लढत आहे काय? साजीद खान यांचा प्रश्न

या पत्राच्या आधारे साजीद खान यांनी आमदार शर्मा हे आता मूर्तिजापुरात लढत आहे काय? असा प्रश्न विचारलाय. ही रुग्णवाहिका मूर्तिजापूर येथील संस्थेला देण्यात येणार असल्यानं यावरुन आमदार शर्मा यांनी लिहिलेल्या पत्राची जोरदार चर्चा होत आहे. पुढील काळात होणाऱ्या मनपा निवडणुकीत हे पत्र भाजपसाठी अडचणीचे तर विरोधकांसाठी महत्वाचे ठरणार आहे. हे पत्रच मनपा विरोधी पक्षनेते साजीद खान पठाण यांनी ऑनलाइन सभेत सर्वांना दाखवल्याने त्यांच्यापर्यंत हे पत्र कसे गेले अशी विचारणा होत आहे.

“भाजपच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांनी हे पत्र विरोधकांच्या हाती दिलं?”

भाजपच्या नेमक्या कुठल्या पदाधिकाऱ्यांनी हे पत्र विरोधकांच्या हाती दिले याची चौकशी करण्याची मागणी पुढील काळात पक्षांतर्गत राजकारणात होण्याची दाट शक्यता आहे. या पत्राने पुन्हा एकदा महानगर पालिकेची निष्क्रियता समोर आली, पण या लेटर बॉम्बने सत्ताधारी भाजपच्या नगर सेवकांची झोप उडवली आहे.

हेही वाचा :

पावसाची दांडी, वातावरणीय बदलाचा फटका, मराठवाडा ते विदर्भ उडीद पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ

उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत, यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप

अकोला जिल्ह्यातल्या दानापूरच्या शिक्षकांचा अनोखा उपक्रम, गल्लीबोळातील सर्व भिंती बोलक्या स्वरूपात

व्हिडीओ पाहा :

BJP MLA Govardhan Sharma letter bomb in Akola Municipal corporation