मुंबई : “बाळासाहेब ठाकरे गर्दी खेचणारे (क्राऊड पूलर) होते. ब्रँड ठाकरे होते, पण ही ओळख सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Nitesh Rane on Sanjay Raut) यांनी पुसली”, असे ट्वीट करत भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांवर टीका केली. शरद पवार यांच्या मुलाखतीनंतर नितेश राणेंनी ट्वीट करत राऊत यांच्यावर टीका (Nitesh Rane on Sanjay Raut) केली.
नितेश राणे म्हणाले, “लहानपणापासून सामनात केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या मॅरेथॉन मुलाखती आपल्याला माहिती आहेत. ही त्यांच्या समर्थकांसाठी आणि त्यांच्या विरोधक अशा दोघांसाठीही मेजवानी असायची. बाळासाहेब ठाकरे गर्दी खेचणारे नेते होते. अगदी शरद पवार ही हे मानायचे, मात्र, हीच ओळख (ब्रँड ठाकरे) सध्याच्या सामनाच्या संपादकांनी संपवली आहे.”
Since childhood we only knew Marathon Interviews of Balasaheb in Samna!It was like a feast 4 his followers as well as his political opponents!Even Pawarsaheb believed Brand Thackeray was the crowd puller!
Now Brand Thackeray is finished by his very own Editor!
SHAME!— nitesh rane (@NiteshNRane) July 11, 2020
नुकतेच नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री 2 या बंगल्यावरही आक्षेप घेत टीका केली होती.
“अरेच्चा आजच संदेसरा घोटाळयात अहमद पटेल यांची ED चौकशी चालू आहे. याच संदेसरा मनी लॉंडरिंग प्रकरणातील आरोपी राजभूषण दिक्षीत आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्री 2 मधील भागीदारी जोरात दिसते. कांग्रेस आणि शिवसेना दोस्ती भी बहोत पुरानी लगती है”, असं ट्वीट नितेश राणेंनी केला होता.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
दरम्यान, सामनाच्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्यासोबतच मी पुन्हा, मी पुन्हा येईल या वक्तव्यावरुन शरद पवारांनी फडणवीसांना टोमणा लगावला.
संबंधित बातम्या :
सिंधुदुर्गातील वादळग्रस्तांना दमडीचीही मदत नाही, ठाकरे सरकारचा कोकणावर कुठला राग? : नितेश राणे
Breaking | परिवहनमंत्री अनिल परब यांना अटक करा, आमदार नितेश राणेंची मागणी