सिंधुदुर्ग : ‘निसर्ग’ वादळाचा फटका बसलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पीडितांना एक रुपयाचीही मदत मिळाली नाही, असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. ठाकरे सरकारचा कोकणावर कुठला राग आहे, असा सवाल नितेश राणेंनी विचारला. (Nitesh Rane on Thackeray Government no relief to Nisarga Cyclone affected victims)
‘निसर्ग’ चक्रीवादळाचा फटका बसलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला जाहीर झालेल्या नुकसान भरपाईच्या निधीवरुन आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. “ठाकरे सरकार कोकणावर कुठला राग काढत आहे?” असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला जाहीर केलेल्या निधीतील एक रुपयाही अद्याप पीडितांना मिळाला नसल्याचा दावा नितेश राणे यांनी केला. 25 कोटींची मदत फक्त जाहीर करण्यात आली, मात्र 100 टक्के पंचनामे होऊनही अजून जिल्ह्यात दमडीही आली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची मदत म्हणून रत्नागिरीला 75 कोटी आणि सिंधुदुर्गला 25 कोटी रुपये जाहीर केले. निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला होता.
हेही वाचा : कपड्यांसाठी 1800, भांड्यांसाठी 2 हजार, घरांसाठी 95 हजार, वादळग्रस्तांसाठी उद्यापासून थेट मदत!
रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गाचे कमी नुकसान झाले आहे, असे सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले होते. 3-4 जूनला कोकणाला ‘निसर्ग’ वादळाचा फटका बसला होता.
Electricity Bill | लॉकडाऊनमधील 50 टक्के वीज बिल माफ करा, नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी https://t.co/ad3J98fN3I @NANA_PATOLE @CMOMaharashtra @OfficeofUT @NitinRaut_INC @gajananumate
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 26, 2020