ज्यांना नीट वाचता येत नाही त्यांनी सल्ले देऊ नये, पडळकरांची रोहित पवारांवर बोचरी टीका

| Updated on: Aug 04, 2021 | 1:18 PM

ज्यांना नीट वाचता येत नाही, त्यांनी केंद्राला सल्ले देण्याचा उद्योग बंद करावा, असा हल्लाबोल भाजप आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLC Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर केला.

ज्यांना नीट वाचता येत नाही त्यांनी सल्ले देऊ नये, पडळकरांची रोहित पवारांवर बोचरी टीका
आमदार गोपीचंद पडळकर, आमदार रोहित पवार
Follow us on

सांगली : ज्यांना नीट वाचता येत नाही, त्यांनी केंद्राला सल्ले देण्याचा उद्योग बंद करावा, असा हल्लाबोल भाजप आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLC Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर केला. ते सांगलीतील झरे या गावात बोलत होते. MPSC परीक्षा आणि रखडलेल्या नियुक्त्यांवरुन पडळकरींनी रोहित पवारांवर टीकास्त्र सोडलं.

आपल्या घरगुती वादात , दुसऱ्या पाल्यांचं भविष्य अंधारात लोटू नका. नीट वाचता न येणाऱ्या आमदार रोहित पवारांनी केंद्रावर नुसते सल्ले देण्याचे उद्योग बंद करावे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.  राज्यातील एमपीएससी परीक्षा, उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या आणि आयोग सदस्य नेमणूक यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर आमदार पडळकर यांनी सडकून टीका केली.

लबाडी करण्यात हे माहीर

नियुक्त्यांबाबत घोषणा करुन 30 दिवस उलटले. रोहित पवारांनी सांगितलं होतं, पण आता 31 तारीख उलटून गेली. लबाडी करण्यात हे माहीर आहेत, पण आता ते स्वत:च यावर वारंवार शिक्कामोर्तब करत आहेत, असा हल्लाबोल पडळकरांनी केला.

या नियुक्त्या तीस दिवस उलटले तरी झालेल्या नाहीत, आपल्या घरगुती वादात इतर पाल्यांचे भविष्य अंधारात लोटू नका, प्रशासनात आपल्या कुटुंबाची किती वचक आहे,असे तुणतुणे वाजवण्यात तुमचे आयुष्य गेले आहे. या तुणतुणे वाजवण्याच्या नादात दुसऱ्यांचे नुकसान करू नका. एमपीएससी परीक्षा कधी घेणार, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती कधी देणार, याचा ताळमेळ नाही, असं पडळकर म्हणाले.

राज्यपाल भवनमुळे लबाडी उघड

तसेच एमपीएससी आयोगाच्या सदस्य नेमणुकीच्या बाबतीत राज्यपालांना 31 जुलैआधी याद्या पाठवल्याचं आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. मात्र आजच राज्यपाल भवनमधून 2 ऑगस्ट रोजी याद्या आल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे हे सर्व किती लबाडी करतात यावर शिक्कामोर्तब केले आहे, असं टीकास्त्र पडळकरांनी सोडलं.

अजित पवार यांनी सभागृहात एक सांगितलं होतं आणि बाहेर येऊन दुसरं सांगितलं. त्यामुळे पवार कुटुंब किती लबाड आहे, हे राज्याला चांगलं माहित आहे. तर रोहित पवार यांना सभागृहामध्ये अटल बिहारी यांची कविता वाचताना, ती नीट वाचता आली नाही. त्यामुळे ज्यांना नीट वाचता येत नाही, त्यांनी केंद्राला सल्ले देण्याचे उद्योग बंद करावेत,असा टोला आमदार रोहित पवार यांनी पडळकर यांना लगावला.

संबंधित बातम्या 

Gopichand Padalkar | MPSC बाबत अजितदादांनी शब्द पाळला का? गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

“भाजपमध्ये उपऱ्यांना स्थान नव्हतं, पण आता बाटगे पालखीत आणि मूळ लोक भंगारात, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय”