सोलापूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची कन्या शरयू देशमुख (Sharayu Deshmukh) यांना प्रत्युत्तर दिलं. “काही घराणे अतिसुसंस्कृत आहेत. मी शिक्षकाचा मुलगा आहे. त्यामुळे मला सुसंस्कृतपणा माहिती आहे. तुमच्या विरोधात बोललं की असंस्कृतपणा दिसतो. मला सुसंस्कृतपणा तुम्ही शिकवू नका, असा हल्लाबोल पडळकरांनी केला. ते सोलापुरात बोलत होते. (BJP MLC Gopichand Padalkar criticize Sharayu Deshmukh daughter of Maharashtra congress leader Balasaheb Thorat)
गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी ट्विट करून बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली होती. पडळकरांच्या टीकेला बाळासाहेब थोरात यांची लेक शरयू देशमुख (Sharayu Deshmukh) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यांच्या भाषेवरुन त्यांच्या संस्काराची ओळख होते, असं म्हणत वडिलांवरच्या टीकेला शरयू देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.
शरयू देशमुख यांच्या या टीकेला पडळकरांनी सोलापुरात उत्तर दिलं. सुसंस्कृतपणा तुम्ही शिकवण्याची गरज नाही. मी शिक्षकाचा मुलगा आहे. तुमच्या विरोधात बोललं की असंस्कृतपणा दिसतो का? असा सवाल पडळकरांनी केला.
माझ्या हातात सूत्र द्या, ओबीसींची गेलेलं आरक्षण मिळवून देतो, नाहीतर राजकारणातून संन्यास घेतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर बोलताना थोरात यांनी फडणवीसांना त्यांच्या जुन्या वाद्याची आठवण करुन देत वेगळा विदर्भ झाल्याशिवाय आपण लग्न करणार नव्हतात, त्याचं काय झालं? असा सवाल केला होता. हाच सवाल पडळकरांच्या जिव्हारी लागला.
थोरात यांच्या टीकेनंतर लागलीच पडळकर यांनी ट्विट करुन थोरातांवर हल्ला चढवला. ‘महसूल मंत्रीपदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्र फडणवीसांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झाले आहे, याचेही भान यांना राहिले नाही.’ अशी टीका त्यांनी केली.
पडळकरांच्या या टीकेला आता बाळासाहेब थोरातांच्या कन्येनं सडेतोड प्रत्युत्तर देताना थेट त्यांचे संस्कारच काढले आहेत. ‘पात्रता पेक्षा जास्त मिळाले की असं होतं. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!’ असं प्रत्युत्तर शरयू देशमुख यांनी ट्विटद्वारे दिलं आहे.
पात्रता पेक्षा जास्त मिळाले कि अस होत. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती. असो, ज्याचे त्याचे संस्कार..! https://t.co/KhFuxuQOSe
— Sharayu Deshmukh (@SharayuDeshm) June 29, 2021
VIDEO : गोपीचंद पडळकर यांची टीका
संबंधित बातम्या
पडळकरांची बाळासाहेब थोरातांवर खालच्या भाषेत टीका, प्रत्युत्तर देताना लेकीने ‘संस्कार’ दाखवले!
रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात, शरद पवारांच्या दिल्ली बैठकीवर पडळकरांची जहरी टीका