नाशिक : शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केल्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप-मनसे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. महाराष्ट्रात नाही, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला असलेल्या नाशकात मनसे-भाजप एकत्र येण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेत प्रभाग सभापतीपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला शह देण्यासाठी भाजप-मनसे एकत्र येण्याची चिन्हं आहेत. (BJP MNS may alliance for Nashik Municipal Corporation Ward Chairman Election)
नाशिक महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त लागला आहे. येत्या 15 ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी सहा प्रभागांच्या निवडणुका होणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गेल्या 6 महिन्यांपासून प्रभाग समिती सभापतींच्या निवडणुका रखडल्या होत्या.
सहा महिन्यांच्या कालावधीनंतर होणाऱ्या निवडणुकांसाठी मनसे आणि भाजप एकमेकांना मदत करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 15 ऑक्टोबर रोजी ऑनलाईन पद्धतीने नाशिक शहरातील सहा प्रभाग सभापतींच्या निवडणुका होणार आहेत. भाजप मनसे पुन्हा एकत्र आल्यास महापालिका निवडणुकांसाठी नव्या समीकरणाची नांदी ठरणार आहे.
नाशिक महापालिकेच्या पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, सातपूर, नाशिक रोड, नवीन नाशिक या प्रभागांसाठी निवडणुका होणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या महाविकास आघाडीला शह देण्यासाठी भाजप-मनसे युतीचा निर्णय घेणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
‘त्या’वेळी महाजनांनी दिले संकेत
मनसे आणि भाजप समविचारी पक्ष आहेत, असं म्हणत भाजपचे संकटमोचक नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जानेवारी महिन्यात मनसे-भाजप युतीचे संकेत दिले होते. भविष्यात काहीही अशक्य नसल्याचंही महाजन म्हणाले होते. विषम विचारी पक्ष एकत्र येत असतील, मग आम्ही तर समविचारी आहोत, असं म्हणत गिरीश महाजनांनी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला लगावला होता. (BJP MNS may alliance for Nashik Municipal Corporation Ward Chairman Election)
काही बाबतीत मतभेद असले, तरी भविष्यात मतं जुळली तर काहीही अशक्य नाही. दोघांमध्ये एकवाक्यता झाली, तर एकत्र येऊ शकतो, लोकांना ते आवडेल. मनसे आणि भाजप एकाच मताचे आहेत, काहीही अशक्य नाही, असे संकेतही गिरीश महाजनांनी दिले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जानेवारी महिन्यात पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केल्यानंतर मनसे-भाजप युतीच्या चर्चा बळावल्या होत्या, मात्र त्या यथावकाश थंडावल्या.
VIDEO : Mumbai | बोरीवलीतील महानगर गॅसच्या भोंगळ कारभाराविरोधात मनसे आक्रमक pic.twitter.com/C3XuUDS7Me
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 13, 2020
संबंधित बातम्या :
मनसे आणि भाजप समविचारी, मनसेच्या झेंड्याच्या अनावरणानंतर गिरीश महाजनांकडून युतीचे संकेत
भाजप-मनसे एकत्र आल्यास भाजपचं नुकसान : रामदास आठवले
(BJP MNS may alliance for Nashik Municipal Corporation Ward Chairman Election)