भाजप खासदारानं सांगितलं शकुनी मामापेक्षा पॉवरफूल कोण? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या विरोधात कुणाचा हल्लाबोल?

| Updated on: Jan 27, 2023 | 1:32 PM

जयंत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीच्या संदर्भात शरद पवार यांची राजकीय खेळी असल्याचा कयास बांधला होता. त्याचा संदर्भ देऊन भाजपचे खासदार यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

भाजप खासदारानं सांगितलं शकुनी मामापेक्षा पॉवरफूल कोण? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या विरोधात कुणाचा हल्लाबोल?
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीच्या संदर्भात केलेल्या विधानाचा संदर्भ देऊन भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीची खेळी केल्याचा कयास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बांधत राजकीय खेळी केल्याचे बोललं होतं. त्यावरून राजकीय वर्तुळात पहाटेचा शपथविधी चर्चेचा विषय ठरत आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथविधी घेऊ राज्यात नवं सरकार आणलं होतं. अवघ्या 72 तास टिकलेलं हे सरकार संपूर्ण देशभरात चर्चेत आलं होतं. त्यानंतर राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी शरद पवार यांनी खेळी खेळली होती अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांच्या विधानानंतर ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार भाजपचे असल्याचे सांगत अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीच्या नंतर एका मुलाखतीत केलेल्या विधानचा संदर्भ दिला होता.

त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतिने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खुलासा करत असतांना राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथविधी घेतला ही राजकीय खेळी असल्याचे बोललं होतं.

हे सुद्धा वाचा

त्यावेळी बोलतांना मात्र शरद पवार यांनी हे सगळं घडवून आणलं असण्याची शक्यता जयंत पाटील यांनी बोलून दाखवली होती. त्याच विधानाचा संदर्भ अनिल बोंडे यांनी दिला आहे.

भाजप खासदार अनिल बोंडे यांनी जयंत पाटील यांना शरद पवार हे शकुनीमामा पेक्षा पॉवरफूल आहे असं म्हणायचे आहे का ? असा सवाल उपस्थित करून टीका केली आहे.

गेल्या काही तासांपासून राज्यातील राजकारणात पहाटेचा शपथविधी चर्चेचा विषय ठरत असून अनिल बोंडे यांनीही यावर प्रतिक्रिया देत शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.