नवी दिल्ली : केंद्रीय अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजप खासदार परवेश सिंग साहिब वर्मा यांचे नाव भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीतून तात्काळ हटवावे, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. पुढील आदेशापर्यंत अनुराग ठाकूर आणि परवेश वर्मांना वगळण्याची सूचना (Anuraj Thakur BJP Campaigner) करण्यात आली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनुराग ठाकूर यांनी गोळ्या घालण्याचा इशारा दिला होता, तर परवेश सिंग साहिब वर्मा यांनी शाहीन बागमधील आंदोलक तुमच्या घरात घुसून बलात्कार करतील, अशी भाषा केली होती.
वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने भाजपच्या दोन्ही खासदारांना कालच नोटीस बजावली होती. उत्तर देण्यासाठी ठाकूर आणि परवेश सिंग यांना उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी दोघांवर कारवाई केली जाऊ शकते.
दिल्लीतल्या शाहीनबागमध्ये ‘सुधारित नागरिकत्व कायदा’ अर्थात CAA आणि ‘राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी’ अर्थात NRC विरोधात महिन्याभरापासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात देशविरोधी घोषणाबाजी केली जात असल्याचा आरोप भाजपने केला. त्यानंतर देशाच्या गद्दारांना गोळ्या घाला, असं वक्तव्य अनुराग ठाकूरांनी केलं होतं.
Election Commission issues notice to BJP MP Parvesh Singh Verma for prima facie violating Model Code of Conduct (MCC). EC has given him time till 12 noon on 30th January to provide an explanation, failing which EC will take a decision on the matter. https://t.co/cSpvSS2KDT
— ANI (@ANI) January 29, 2020
परवेश सिंग साहिब वर्मा यांनी शाहीन बागेमधल्या आंदोलकांना बलात्कारी ठरवण्याचा प्रयत्न केला. यांना वेळीच आवरा, नाही तर ते घरात घुसून बलात्कार करतील, असं संतापजनक वक्तव्य त्यांनी केलं होतं.
ठाकूर आणि परवेश सिंग यांच्या वक्तव्यानंतर देशभरातून टीकेची झोड उठली होती. ‘माझ्या छाताडात गोळ्या घाल’ असं प्रत्युत्तर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दिलं होतं.
स्टार प्रचारक महत्त्वाचे का?
स्टार प्रचारकांबाबत एक महत्त्वाची तरतूद अशी, की त्या व्यक्तींचा प्रवास खर्च पक्षाच्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या हिशोबात मोजला जाऊ नये.
राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय निवडणुकांसाठी राजकीय पक्ष नामांकित राजकीय नेते किंवा लोकप्रिय चेहरे (सेलिब्रिटी) असलेल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे देते. एखाद्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय पक्षाकडे जास्तीत जास्त 40 स्टार प्रचारक असू शकतात.
Anuraj Thakur BJP Campaigner