सातारा: भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी काही दिवसांपूर्वी भीक मांगो आंदोलनाच्या माध्यमातून गोळा करुन दिलेले पैसे सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परत केले आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मनीऑर्डर करुन उदयनराजे भोसले यांना 450 रुपये परत केले. (Satara collector give back money of BJP MP Udayanraje Bhosale)
उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील पोवई नाक्यावर लॉकडाऊनविरोधात प्रतिकात्मक आंदोलन केले होते. त्यावेळी उदयनराजे तेथील फुटपाथवर कटोरा घेऊन बसले होते. यावेळी लोकांनी त्यांच्या कटोऱ्यात पैसे टाकले होते. ही एकूण रक्कम 450 रुपये इतकी होती. हे पैसे उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले होते.
देशात फॅमिली प्लॅनिंग केले असते तर आज कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता, असे वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केले होते. देशात लोकसंख्या पाहूनच कोरोना लसींचे वाटप झाले पाहिजे. लसीच्या वाटपावरून उगाच वाद निर्माण करण्यात अर्थ नाही, असे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले होते.
शनिवारी आणि रविवारी दुकानं बंद ठेवायला कोरोना व्हायरस फक्त तेव्हाच बाहेर येतो का?, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला होता. राज्यभरातील व्यापाऱ्यांच्या व्यथा सारख्याच आहेत. माणूस जगण्याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे काळजी घेणे हाच मार्ग आहे. मृत्यूचे प्रमाण पाहता प्रत्येकाला उदंड आयुष्य लाभो, अशा माझ्या सदिच्छा असल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.
संबंधित बातम्या:
Udayan Raje Bhosale | खासदार उदयनराजे भोसले यांचं लॉकडाऊन विरोधात कटोरा घेऊन आंदोलन
कटोरा घेऊन उदयनराजे रस्त्यावर, तर सातारचा दुसरा खासदार गहू काढण्यासाठी शेतात!
(Satara collector give back money of BJP MP Udayanraje Bhosale)