भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा; महाराष्ट्रातील ‘या’ तीन नेत्यांना संधी

| Updated on: Jul 29, 2023 | 11:58 AM

BJP National Team : भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा; 'या' दोन माजी मुख्यमंत्र्यांना संधी तर महाराष्ट्रातील 'या' तीन नेत्यांची वर्णी

भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा; महाराष्ट्रातील या तीन नेत्यांना संधी
BJP National Team Pankaja Munde Vinod Tawade Pankaja Munde Vijaya Rahatkar Vasundhara Raje Announced by J P Nadda Marathi News
Follow us on

नवी दिल्ली | 29 जुलै 2023 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव जे पी नड्डा यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे. यात जुन्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यात दोन माजी मुख्यमंत्र्यांचा तर राज्यातील तीन नेत्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील तीन नेत्यांना संधी

भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन नेत्यांना संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया रहाटकर या तीन नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पंकजा मुंडे यांच्याकडे राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी कायम आहे. तर विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपद कायम ठेवण्यात आलं आहे. विजया रहाटकर यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत या तीनही नेत्यांचं अभिनंदन केलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांचं ट्विट

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे पी नड्डाजी यांनी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्या मध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रीय सरचिटणीसपदी मा. विनोदजी तावडे तसेच राष्ट्रीय सचिवपदी पंकजाताई मुंडे व विजयाताई रहाटकर यांची निवड झाली आहे. या तिघांचे व अन्य पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमन सिंह यांच्यावर राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजपच्या केंद्रीय उपाध्यक्षांची नावं

रमन सिंह- छत्तीसगढ़

वसुंधरा राजे- राजस्थान

रघुबर दास- झारखंड

सौदान सिंह- मध्य प्रदेश

वैजयंत पांडा- ओडिशा

सरोज पांडे- छत्तीसगड

रेखा वर्मा- उत्तर प्रदेश

डी के अरुण- तेलंगणा

एम चौबा एओ- नगालैंड

अब्दुल्ला कुट्टी- केरळ

लक्ष्मीकांत बाजपेई- उत्तर प्रदेश

लता उसेंडी- छत्तीसगड

तारिक मंसूर- उत्तर प्रदेश

भाजपचे राष्ट्रीय महामंत्री

अरुण सिंह- उत्तर प्रदेश

कैलाश विजयवर्गी- मध्य प्रदेश

दुष्यंत कुमार गौतम- दिल्ली

तरुण चुग- पंजाब

सुनील बंसल- राजस्थान

संजय बंदी- तेलंगाना

राधामोहन अग्रवाल- उत्तर प्रदेश

आंध्र प्रदेशचे प्रभारी देवधर यांना या यादीतून हटवण्यात आलं आहे. तर सीटी रवी, दिलीप सैकिया यांनाही महामंत्रिपदावरून बाजूला करण्यात आलं आहे.