प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाल्यास भाजपचं एकही कार्यालय ठेवणार नाही : भीम आर्मी

| Updated on: May 22, 2019 | 6:42 PM

मुंबई : एक्झिट पोलनंतर ईव्हीएमवर संशय घेण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता हिंसाचाराच्या धमक्याही दिल्या जात आहेत. सोलापुरातून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाल्यास भाजपचं एकही कार्यालय ठेवणार नाही, अशी धमकी भीम आर्मीने दिली आहे. शिवाय राज्यात भाजपच्या नेत्यांना फिरु न देण्याची धमकीही भीम आर्मीकडून देण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर […]

प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाल्यास भाजपचं एकही कार्यालय ठेवणार नाही : भीम आर्मी
Follow us on

मुंबई : एक्झिट पोलनंतर ईव्हीएमवर संशय घेण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता हिंसाचाराच्या धमक्याही दिल्या जात आहेत. सोलापुरातून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाल्यास भाजपचं एकही कार्यालय ठेवणार नाही, अशी धमकी भीम आर्मीने दिली आहे. शिवाय राज्यात भाजपच्या नेत्यांना फिरु न देण्याची धमकीही भीम आर्मीकडून देण्यात आली आहे.

प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर या दोन मतदारसंघातून लढत आहेत. सोलापुरातून जर त्यांचा पराभव झाला तर भाजपचे सर्व कार्यालयं तोडून टाकू, अशी धमकी भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख अशोक कांबळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. सोलापुरात प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांचं आव्हान आहे. काही एक्झिट पोलमध्ये सोलापुरात भाजप, तर काहींनी काँग्रेसचा विजय होत असल्याचा अंदाज व्यक्त केलाय.

प्रकाश आंबेडकर यांचा भारिप आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने 48 जागांवर उमेदवार दिले होते. ईव्हीएममध्ये घोळ झाला नाही तर आमचे सर्वच्या सर्व 48 उमेदवार निवडून येतील, असा आश्चर्यकारक दावाही प्रकाश आंबेडकरांनी केला होता. प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून भाजपची बी टीम असा आरोप केला जातो. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. आम्हाला बी टीम म्हणून हिणवलं गेलं, पण आम्ही आमची मतं मिळवणार आणि जरी काँग्रेसनं आमचा खिमा केला, तरी आम्ही धर्मनिरपेक्ष ताकदीबरोबर राहणार, असं ते म्हणाले.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 58.45 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. इथं भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी, काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत झाली.

VIDEO :