जळगाव : राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडून भाजपला हादरे सुरुच आहेत. भाजपचे ‘संकटमोचक’ नेते अशी ओळख असलेले माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यात खडसेंनी सुरुंग लावला. जामनेरमधील ‘दोन बस’ भरुन भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. (BJP officials from Girish Mahajan’s Jamaner Constituency joins NCP in presence of Eknath Khadse)
गेल्या काही दिवसांपासून भाजपमधून राष्ट्रवादीत पदाधिकारी-कार्यकर्त्यांचं आऊटगोइंग सुरु झालं आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील भाजपचे दोनशेहून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला. एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला
दोन लक्झरी बसेस भरुन भाजप कार्यकर्ते पक्षप्रवेशाच्या सोहळ्यासाठी दाखल झाले होते. खडसेंच्या मुक्ताईनगरच्या फार्म हाऊसवर गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील भाजपच्या 200 कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यावेळी उपस्थित होत्या.
गिरीश महाजन आणि खडसेंमध्ये शाब्दिक युद्ध
फडणवीस सरकारच्या काळात गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे यांचे प्रतिस्पर्धी म्हणून उदयाला आले. देवेंद्र फडणवीस यांनी नियोजनपूर्वक रसद पुरवून गिरीश महाजन यांना जिल्ह्यात मोठे गेले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन अशी दोन शक्तीकेंद्रे उभी झाली होती. आता एकनाथ खडसे भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.
“भाजपला ताकद दाखवून देतो”
“आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल, अशी गर्जना एकनाथ खडसे यांनी कालच केली होती. जळगावात भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. हे कार्यकर्ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावाही एकनाथ खडसे यांनी केला होता.
जळगावात भाजपच्या 60 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग सुरु झाल्याचे चित्र आहे.
शहादा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (@NCPspeaks) नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे जी (@EknathGKhadse), स्थानिक लोकप्रतिनिधी,पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते(BJP officials from Girish Mahajan’s Jamaner Constituency joins NCP in presence of Eknath Khadse) उपस्थित होते. pic.twitter.com/Qc2UW3Summ
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) November 2, 2020
संबंधित बातम्या :
आता भाजपला ताकद दाखवतो, उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी; एकनाथ खडसेंची गर्जना
भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले, आपण पक्ष सोडल्याने अनागोंदी माजणार नाही; महाजनांचा खडसेंना टोला
खडसेंच्या बालेकिल्ल्यातील भाजपच्या पक्षबांधणी बैठकीचा उडाला फज्जा; कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ
(BJP officials from Girish Mahajan’s Jamaner Constituency joins NCP in presence of Eknath Khadse)