मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेशाचे आवाहन करुन काही तास उलटत नाहीत, तोच त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. भाजपच्या मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधले. (BJP Officials Joins NCP in presence of Chhagan Bhujbal Nawab Malik hours after Anil Gote appeals)
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत भाजप मुंबईचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. यावेळी अजय मकवाना, हर्षल गुरव, प्रथमेश मिस्री, विनायक पोळके, सुनिल धुरी यांचे छगन भुजबळ यांनी पक्षात स्वागत केले.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. @ChhaganCBhujbal व अल्पसंख्याक मंत्री ना. @OfficeofNM यांच्या उपस्थितीत भाजपा मुंबईचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी @NCPspeaks पक्षात प्रवेश केला. अजय मकवाना,हर्षल गुरव,प्रथमेश मिस्री,विनायक पोळके,सुनिल धुरी यांचे श्री. भुजबळ यांनी पक्षात स्वागत केले. pic.twitter.com/HHnzb4AxeN
— NCP (@NCPspeaks) October 27, 2020
उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येणाऱ्या काळात सत्तांतर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी एक पत्रक काढून भाजपात गेलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात येण्याचे निमंत्रण दिले. सध्या हे पत्रक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.
एकनाथ खडसे यांच्याआधीच धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनीही भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. (BJP Officials Joins NCP in presence of Chhagan Bhujbal Nawab Malik hours after Anil Gote appeals)
सत्तांतरासाठी गोटे-खडसे प्रयत्न करणार
सध्या धुळे जिल्ह्यात धुळे महानगरपालिका, दोंडाईचा नगरपालिका आणि शिरपूर नगरपालिका येथे भाजपची एकहाती सत्ता आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तांतर करण्यासाठी एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे हे एकत्र येऊन काम करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
सध्या माझ्या संपर्कात भाजपचे 16 नगरसेवक आहेत आणि अनेक जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत, परंतु पक्षश्रेष्ठींचा आदेश येईपर्यंत सध्या तरी काहीच हालचाली आम्ही करणार नाही. आदेश आला की 24 तासात चमत्कार दिसेल, असे गोटे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला सांगितलं.
धुळे महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. मात्र, यातील बहुतांश नगरसेवक हे राष्ट्रवादीतून भाजपात गेले आहेत. येणाऱ्या काळात हेच नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत आल्यास धुळे महानगरपालिकेत सत्तांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संबंधित बातम्या :
गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची धडक, जामनेरमध्ये कार्यालय सुरू
(BJP Officials Joins NCP in presence of Chhagan Bhujbal Nawab Malik hours after Anil Gote appeals)