मुंबई : सरकार पाडणार नसून मजबूत विरोधी पक्षाच्या भूमिकेत असल्याचं (Devendra Fadnavis Cover Up Chandrakant Patils Statement) फडणवीसांनी स्पष्ट केलं. मात्र, चंद्रकांत पाटलांच्या एका वक्तव्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर फडणवीसांनी याबाबत सारवासारव केली (Devendra Fadnavis Cover Up Chandrakant Patils Statement).
‘सरकार पाडणार नाही, चालवून तर दाखवा’, असं आव्हान देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलं. पण, दुसरीकडे बिहारच्या राजकारणाचा दाखला देत चंद्रकांतदादांनी महाराष्ट्रातही पुनरावृत्तीची शक्यता बोलून दाखवली. त्यामुळे काही कार्यकर्त्यांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला. मात्र, त्याचवेळी शिवसेनेला जर उपरती झाली, तर ते येतील. भाजपने हात पुढे केला असं समजू नका, असं चंद्रकांत पाटलांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना म्हटलं.
हेही वाचा : “तेव्हा फडणवीसांच्या मनाला वेदना झाल्या नाहीत का?” अशोक चव्हाणांचा तिरकस सवाल
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांनी चंद्रकांत पाटलांच्या या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होऊ शकतो, हे लक्षात येताच फडणवीसांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला (Devendra Fadnavis Cover Up Chandrakant Patils Statement).
चंद्रकांत पाटलांनी कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपचं उदाहरण दिलं असलं, तरी सध्या भक्कम विरोधी पक्ष म्हणून काम करणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण होऊ नये, म्हणून फडणवीसांनी समोर येऊन पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
“राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत, पण जरी एकत्र यायची वेळ आली, तर निवडणुका एकत्र लढणार नाही” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. बिहारच्या राजकारणाचा दाखला देत चंद्रकांत पाटलांनी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता बोलून दाखवली. आम्ही हात पुढे केला असा त्याचा अर्थ नाही, भविष्यातील या राजकीय शक्यता असल्याचे ते म्हणाले.
ना आमचा शिवसेनेला प्रस्ताव, ना शिवसेनेचा आम्हाला : देवेंद्र फडणवीस https://t.co/B2JvYITpKq @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @ShivSena @OfficeofUT @ChDadaPatil @SandeshShirke8
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 28, 2020
Devendra Fadnavis Cover Up Chandrakant Patils Statement
संबंधित बातम्या :
शिवसेनेला उपरती झाली, तर ते येतील, भाजपने हात पुढे केला असे अर्थ काढू नका : चंद्रकांत पाटील
राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत येण्यास तयार : चंद्रकांत पाटील