नवी दिल्ली : अवघ्या तीन महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी महत्त्वाच्या समितीच्या जाहीर केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचं संकल्प पत्र तयार करणाऱ्या समितीमध्ये खासदार नारायण राणे यांचाही समावेश आहे. अमित शाहांकडून तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे.
संकल्प पत्र हा भाजपचा निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल. या मुद्द्यांवरच निवडणूक लढवली जाईल. या महत्त्वाच्या समितीमध्ये राणेंना स्थान दिल्याने ते अजून भाजपच्या दूर गेले नसल्याचं या निमित्ताने समोर आलंय. भाजप आणि नारायण राणे यांचं जमत नसल्याचं काही दिवसांपासून बोललं जात होतं.
अमित शाह यांनी संकल्प पत्र समिती, प्रचार-प्रसार आणि सामाजिक-स्वयंसेवी संघटन संपर्क समिती यांची घोषणा केली आहे. राणे सदस्य असलेल्या संकल्प पत्र समितीचे अध्यक्ष गृहमंत्री राजनाथ सिंह हे आहेत. तर प्रचाराचं धोरण आखण्याची जबाबदारी अरुण जेटलींच्या समितीकडे देण्यात आली आहे.