नवी दिल्ली : भाजपने पहिल्या तिन्ही यादीत (BJP fourth Candidate List) होल्डवर ठेवलेल्या एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. नुकतंच भाजपची चौथी यादी जाहीर (BJP fourth Candidate List) झाली आहेत. या यादीत मुक्ताईनगरमधून खडसेंच्या जागी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर बोरीवलीतून विनोद तावडेंच्या जागी सुनिल राणे आणि घाटकोपर पूर्वमधून प्रकाश मेहतांच्या जागी पराग शहांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे विनोद तावडे आणि प्रकाश मेहतांचा पत्ता कट (BJP fourth Candidate List) करण्यात आला आहे.
खडसेंच्या उमेदवारीसाठी प्रयत्न
एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात यावी यासाठी खडसे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांच्या सून रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचीही माहिती आहे. खडसेंच्या उमेदवारी संदर्भात भाजपातील प्रमुख नेत्यांनीही बोलण्यासाठी नकार दिला होता.
खडसेंचं नाव पहिल्या यादीत नसल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मुक्ताईनगर येथील खडसेंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जमा होत जोरदार घोषणाबाजी केली. खडसेंना तिकीट न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा कार्यकर्त्यांकडून देण्यात आला होता.
गेल्या सहा वेळेपासून भाजपाकडून मुक्ताईनगरातून निवडून येणारे खडसे त्यांचं पहिल्या यादीत नाव नसल्याने कमालीचे निराश झाले होते. विशेष म्हणजे भाजपच्या पहिल्या यादीत नाव न आल्यानंतरही खडसे (Rohini Eknath Khadse) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज दाखल करताना पुढच्या यादीत नाव येईल असा आशावाद व्यक्त केला होता.
#BREAKING : भाजपची चौथी यादी जाहीर, विनोद तावडे, प्रकाश मेहतांचं तिकीट कापलं, एकनाथ खडसेंच्या मुलीला मुक्ताईनगरमधून उमेदवारी, चौथ्या यादीत एकूण सात उमेदवार pic.twitter.com/vqwNNOCGCR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 4, 2019
भाजपची संपूर्ण यादी
देवेंद्र फडणवीस – नागपूर दक्षिण पश्चिम
चंद्रकांत पाटील – कोथरुड
राजेश पडवी – शहादा
विजयकुमार गावित – नंदुरबार
भरत गावित – नवापूर
ज्ञानज्योती पाटील – धुळे ग्रामीण
जयकुमार रावल – सिंदखेडा
हरिभाऊ जावळे – रावेर
संजय सावकारे – भुसावळ
सुरेश भोळे – जळगाव शहर
शिरीष चौधरी – अंमळनेर
मंगेश चव्हाण – चाळीसगाव
गिरीश महाजन – जामनेर
चैनसुख संचेती – मलकापूर
श्वेता महाले – चिखली
आकाश फुंडकर – खामगाव
संजय कुटे – जळगाव जामोद
प्रकाश भारसाकळे – अकोट
गोवर्धन शर्मा – अकोला पश्चिम
रणधीर सावरकर – अकोला पूर्व
हरिश पिंपळे – मुर्तीजापूर
लखन मलिक – वाशिम
राजेंद्र पटनी – कारंजा
सुनिल देशमुख – अमरावती
रमेश बुंदिले – दर्यापूर
अनिल बोंडे – मोर्शी
दादाराव केचे – आर्वी
समीर कुणावार- हिंगणघाट
पंकज भोयर – वर्धा
राजीव पोतदार – सावनेर
50 हिंगणा- समीर मेघे
51 उमरेड – सुधीर पारवे
53 नागपूर दक्षिण- मोहन माटे
54 नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे
55 नागपूर मध्य- विकास कुंभारे
56 नागपूर पश्चिम – सुधाकर देशमुख
57 नागपूर उत्तर – मिलिंद माने
63 अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले
64 तिरोरा- विजय रहांगदळे
66 आमगाव – संजय पुरम
67 आरमोरी – कृष्णा गजभे
68 गडचिरोली – देवराव होळी
70 राजुरा- संजय धोटे
71 चंद्रपूर – नाना श्यामखुळे
72 बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
74 चिमूर- किर्तीकुमार भांगडिया
76 वणी – संजीव रेड्डी बोदकुरवार
77 राळेगाव- अशोक उइके
78 यवतमाळ- मदन येरावर
80 अर्णी – संदीप धुर्वे
85 भोकर- बापूसाहेब गोर्टेकर
91 मुखेड- तुषार राठोड
94 हिंगोली-तानाजी मुटकुळे
99 परतुर – बबनराव लोणीकर
102 बदनापूर – नारायण कुचे
103 भोकरदन – संतोष दानवे
106 फुलंब्री- हरिभाऊ बागडे
109 औरंगाबाद पूर्व- अतुल सावे
111 गंगापूर- प्रशांत बंब
118 चांदवड- राहुल अहेर
124 नाशिक मध्य- देवयानी फरांदे
125 नाशिक पश्चिम- सीमा हिरे
128 डहाणू – पास्कल धनारे
129 विक्रमगड – हेमंत सावरा
136 भिवंडी पश्चिम – महेश चौगुले
139 मुरबाड – किसन कथोरे
142 कल्याण पूर्व – गणपत गायकवाड
143 डोंबिवली- रविंद्र चव्हाण
145 मिरा-भाईंदर- नरेंद्र मेहता
148 ठाणे- संजय केळकर
ऐरोली- संदीप नाईक
बेलापूर- मंदा म्हात्रे
दहिसर- मनिषा चौधरी
मुलुंड- मिहीर कोटेचा
कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर
चारकोप- योगेश सागर
गोरेगाव- विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम- अमित साटम
विलेपार्ले- पराग अळवणी
घाटकोपर पश्चिम – राम कदम
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
सायन कोळीवाडा – तमिळ सेलवान
मुंबई
180 वडाळा – कालिदास कोळंबकर
185 मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
रायगड
188 पनवेल – प्रशांत ठाकूर
191 पेण – रवीशेठ पाटील
पुणे
198 शिरुर – बाबुराव पाचरणे
200 इंदापूर – हर्षवर्धन पाटील
205 चिंचवड – लक्ष्मण जगताप
207 भोसरी – महेश लांडगे
208 वडगाव शेरी – जगदीश मुळीक
209 शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे
211 खडकवासला – भीमराव तापकीर
212 पर्वती – माधुरी मिसाळ
213 हडपसर – योगेश टिळेकर
214 पुणे कँटोनमेंट – सुनिल कांबळे
215 कसबा पेठ – मुक्ता टिळक
अहमदनगर
216 अकोले – वैभव पिचड
218 शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
219 कोपरगाव – स्नेहलता कोल्हे
221 नेवासा – बाळासाहेब मुरकुटे
222 शेवगाव-पाथर्डी – मोनिका राजळे
223 राहुरी – शिवाजीराव कर्डिले
226 श्रीगोंदा – बबनराव पाचपुते
227 कर्जत जामखेड – राम शिंदे
बीड
228 गेवराई – लक्ष्मण पवार
229 माजलगांव – रमेश आडासकर
231 आष्टी – भीमराव धोंडे
233 परळी – पंकजा मुंडे
लातूर
236 अहमदपूर – विनायक पाटील
238 निलंगा – संभाजी निलंगेकर पाटील
239 औसा – अभिमन्यू पवार
उस्मानाबाद
241 तुळजापूर – राणा जगजितसिंह
248 सोलापूर शहर उत्तर – विजयराव देशमुख
251 सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
256 वाई – मदन भोसले
258 माण – जयकुमार गोरे
सातारा
260 कराड दक्षिण – अतुल भोसले
262 सातारा – शिवेंद्रराजे भोसले
कोल्हापूर
274 कोल्हापूर दक्षिण – अमल महाडीक (भाजप)
279 इचलकरंजी – सुरेश हळवणकर
सांगली
281 मिरज – सुरेश खाडे
282 सांगली – सुधीर गाडगीळ
284 शिराळा – शिवाजीराव नाईक
288 जत – विलासराव जगताप
मोहन गोकुळ सुर्यवंशी – साक्री
प्रतापदादा अरुणभाऊ अडसाद – धामणगाव रेल्वे
रमेश मावस्कर – मेळघाट
गोपाळदास अग्रवाल – गोंदिया
अमरिशराजे आत्रम – अहेरी
निलय नाईक – पुसद
नामदेव ससाणे – उमरेड
दिलीप बोरसे – बागलन
कुमार उत्तमचंद ऐलानी – उल्हासनगर
गोपीचंद पडळकर – बारामती
संजय (बाळा) भेगडे – मावळ
नमिता मुंदडा – केज
शैलेश लाहोटी – लातूर (शहर)
अनिल कांबळे – उदगीर
तिसरी यादी
भाजपची चौथी यादी
भाजपची चौथी यादी
महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपने चौथी उमेदवार यादी जाहीर केली आहे. भाजपने पहिल्या तिन्ही यादीत होल्डवर ठेवलेल्या एकनाथ खडसे, विनोद तावडे यांचा या यादीतही समावेश नाही. भाजपने यापूर्वी दोन याद्यांमध्ये 139 उमेदवार जाहीर केले होते, त्यानंतर तिसऱ्या यादीत चार आणि चौथ्या यादीत सहा उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. त्यानुसार आतापर्यंत 150 उमेदवारांची नावं भाजपने जाहीर केली आहेत.