नवी दिल्ली : गायक अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं (Adnan Sami Padma shri Controversy). मात्र, यावर काँग्रेसने अनेक प्रश्न उपस्थित केले. काँग्रेसच्या या प्रश्नांवर आता भाजप प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) यांनी उत्तर दिलं आहे. संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसला उत्तर देत एक गाणं म्हटलं. “कांग्रेस की सोच थोड़ी सी लिफ्ट करा दे, सद्बुद्धी उनको जरा गिफ्ट करा दे” (Adnan Sami Padma shri Controversy), हे गाणं म्हणत संबित पात्रा यांनी काँग्रेसला चिमटे काढले. विशेष म्हणजे हे गाणं अदनान सामींच्या ‘मुझको भी तो लिफ्ट करा दें’ या गाण्याची पॅरोडी होतं.
“26 जानेवारीच्या निमित्ताने अदनान सामी यांना पद्मश्री सन्मान देण्यावर काँग्रेस प्रश्न उपस्थित करत आहे. उलट काँग्रेसने हे म्हणायला हवं की, ते एक उत्कृष्ट गायक आणि संगीतकार आहेत. त्यांच्या नावे अनेक रेकॉर्ड्स आहेत”, असं संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.
“अदनान हे पाकिस्तानी मुस्लीम होते, त्यांना कायद्याअंतर्गत भारताची नागरिकत्व देण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना पुरस्कार देण्यावर प्रश्न उपस्थित व्हायला नको”, असं संबित पात्रा म्हणाले. तसेच, अदनान यांचे वडील हे पाकिस्तानी सैन्यात होते, असं विरोधी पक्ष म्हणत आहे. यावर उत्तर देत पात्रा म्हणाले, “काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे वडीलही फासिस्ट सेनेत होते, मग त्यांना या आधारे नागरिकत्व देणे बरोबर आहे का?”, असा प्रश्न संबित पात्रा यांनी उपस्थित केला.
भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी या वादावर काँग्रेस पक्षावर उपरोधिकपणे एक गाणंही म्हटलं. हे गाणं अदनान सामींच्या गाण्याची पॅरोडी आहे.
तेरी ऊंची शान है भगवन
मेरी अर्जी मान ले भगवन
तू है सब कुछ जानने वाला
मैं हूं तेरा मानने वाला
कैसे-कैसों को दिया है
ऐसे वैसों को दिया है
कांग्रेस की सोच थोड़ी सी लिफ्ट करा दे
सद्बुद्धी उनको जरा गिफ्ट करा दे
अदनान सामींना पद्मश्री, मनसे आणि काँग्रेसचा विरोध
केंद्र सरकारने प्रसिद्ध गायक अदनान सामींना दिलेल्या पद्मश्री पुरस्काराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) विरोध केला आहे (MNS oppose Padma shri to Adnan Sami). अदनान सामी हे मूळ भारतीय नागरिक नसल्याचं कारण सांगत मनसेने अदनान सामींचा पुरस्कार रद्द करण्याची मागणी केली. काँग्रेसनेही अदनान सामी यांचा पद्मश्री पुरस्कार रद्द करण्याची मागणी केली. अदनान सामी हे भारतीय नाहीत, तसेच, त्यांचे वडील हे पाकिस्तानी सैन्यात होते, असं काँग्रेसचं म्हणणं आहे.
पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्म विभूषण 2020
केंद्र सरकारकडून वर्ष 2020 मधील पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्म विभूषण पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली (Announcement of Padma Awards). यामध्ये बॉलिवूडच्या चार दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. गायक अदनान सामी, अभिनेत्री कंगना रानावत, दिग्दर्शक एकता कपूर आणि करण जोहर या चार कलाकारांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात (Announcement of Padma Awards) आलं.