विदर्भाची वक्रदृष्टी, धोक्याची घंटा, भाजपला कोणत्या विभागात किती जागा?

| Updated on: Oct 24, 2019 | 6:31 PM

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक जागी आश्चर्यकारक निकाल पाहायला (BJP Seats in Vidhasabha 2019) मिळाले. अब की बार 220 पारचा नारा देणाऱ्या भाजपला शंभरी गाठताना नाकी नऊ आल्याचं पाहायला मिळालं.

विदर्भाची वक्रदृष्टी, धोक्याची घंटा, भाजपला कोणत्या विभागात किती जागा?
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक जागी आश्चर्यकारक निकाल पाहायला (BJP Seats in Vidhasabha 2019) मिळाले. अब की बार 220 पारचा नारा देणाऱ्या भाजपला शंभरी गाठताना नाकी नऊ आल्याचं पाहायला मिळालं. भाजप-शिवसेना युतीला यंदा मोठा फटका बसला. दोन्ही पक्षांनी यंदा युती करुनही दोन्ही पक्षाच्या जागा (BJP Seats in Vidhasabha 2019) घटला.

विदर्भात सर्वाधिक फटका

2014 च्या निवडणुकीत भरभरुन देणाऱ्या विदर्भाची, यंदा भाजपवर वक्रदृष्टी पडल्याचं चित्र आहे. कारण 2014 मध्ये विदर्भातील 62 जागांपैकी तब्बल 44 जागी एकट्या भाजपने विजय मिळवला होता. त्यावेळी शिवसेनेसोबत भाजपची युती नव्हती. 2014 मध्ये शिवसेनेला केवळ 4 जागा मिळाल्या होत्या.

2019 मध्ये भाजपला विदर्भात सर्वात मोठा फटका बसला. यंदा विदर्भात भाजपला केवळ 30 जागांवर आघाडी घेता आली. काँग्रेसने गमावलेल्या या आपल्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारत जवळपास 14 तर राष्ट्रवादीने 6 जागांवर आघाडी (BJP Seats in Vidhasabha 2019) घेतली.

विदर्भ (62) – 2014 मधील बलाबल  

पक्ष जागा
भाजप 44
शिवसेना 04
काँगेस 10
राष्ट्रवादी 01
इतर 03
एकूण 62

 मराठवाड्यातही फटका

शंभरी गाठताना दमछाक होणाऱ्या भाजपला मराठवाड्यातही दणका बसला. पंकजा मुंडेंसारख्या दिग्गज मंत्र्यांचा पराभव झाला. 2014 मध्ये मराठवाड्या भाजपने 46 पैकी 15 जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेला त्यावेळी 11 जागा होत्या.

2019 मध्ये जाहीर झालेल्या निकालामध्ये मराठवाड्यात भाजपला केवळ 11 जागांवर आघाडी मिळाली.

मराठवाडा (46)  2014 मधील बलाबल

पक्ष जागा
भाजप 15
शिवसेना 11
काँगेस 09
राष्ट्रवादी 08
इतर 03
एकूण 46

 पश्चिम महाराष्ट्र

भाजपने 2014 मध्ये पश्चिम महाराष्ट्रात 24 जागा जिंकल्या होत्या. 2019 च्या निवडणुकीत आतापर्यंत जाहीर झालेल्या मतमोजणीत भाजपला पश्चिम महाराष्ट्रात दोन जागा गमवाव्या लागल्याचं चित्र आहे.

 उत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या जागा काहीशा वाढल्याचं चित्र आहे. जे राज्यभरात गमावलं ते उत्तर महाराष्ट्रात कमावल्याचं दिसून (BJP Seats in Vidhasabha 2019) येतंय.

भाजपने 2014 मध्ये जिंकलेल्या जागा = 14

2019 मध्ये भाजपला मिळालेली आघाडी 17

उत्तर महाराष्ट्र (35) –2014 मधील बलाबल

पक्ष जागा
भाजप 14
शिवसेना 07
काँगेस 07
राष्ट्रवादी 05
इतर 02
एकूण 35

 कोकण

कोकणात भाजपला 2014 मध्ये 10 जागा मिळाल्या होत्या. यंदा भाजपला ठाण्यासह कोकणातील 39 जागांपैकी अनेक जागांवर फटका बसला.

कोकण (39) 2014 चं बलाबल

पक्ष जागा
भाजप 10
शिवसेना 14
काँगेस 01
राष्ट्रवादी 08
इतर 06
एकूण 39

 मुंबई

मुंबईतील 36 जागांवर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा असतो. शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या मुंबईत, भाजपने  2014 च्या निवडणुकीत 15 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेला 14 जागा मिळाल्या होत्या. यंदाही भाजपने आपल्या आहेत त्या जागा राखण्यात यश मिळवलं आहे.

 मुंबई (36) -2014 मधील बलाबल

 पक्ष जागा
भाजप 15
शिवसेना 14
काँगेस 05
राष्ट्रवादी 00
इतर 02
एकूण 36