बारामतीत भाजप सुप्रिया सुळेंविरोधात महिला उमेदवार देण्याच्या तयारीत?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

बारामती : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात. त्यामध्ये बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. मात्र सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपकडून नेमकं निवडणूक कोण लढवणार याबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रम निर्माण झालाय. दुसरीकडे भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी बारामतीची जागा जिंकण्याचा मनसुबा व्यक्त केलेला असताना भाजपकडून अद्याप उमेदवार कोण हेच […]

बारामतीत भाजप सुप्रिया सुळेंविरोधात महिला उमेदवार देण्याच्या तयारीत?
Follow us on

बारामती : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात. त्यामध्ये बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. मात्र सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपकडून नेमकं निवडणूक कोण लढवणार याबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रम निर्माण झालाय. दुसरीकडे भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी बारामतीची जागा जिंकण्याचा मनसुबा व्यक्त केलेला असताना भाजपकडून अद्याप उमेदवार कोण हेच गुलदस्त्यात ठेवण्यात आलंय.

बारामतीसाठी भाजपकडून वेगवेगळ्या उमेदवारांची चाचपणी सुरु असल्याचं बोललं जात असलं तरी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी बारामतीची जागा आपल्यालाच हवी असा पवित्रा घेतला आहे. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने युतीवर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला. मात्र भाजपकडून याबाबत कोणताच निर्णय झालेला नसल्याने बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

सुप्रिया सुळेंची निवडणुकीची तयारी सुरु

बारामती लोकसभेच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा उमेदवारी जाहीर केली. 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना कडवी झुंज दिली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे या 69 हजारांच्या मताधिक्क्याने निवडून आल्या. राजकीय विश्लेषकांच्या मते, त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात प्रचंड बदल झालेला आहे. पुण्यात मध्यंतरी झालेल्या कार्यक्रमात अमित शाहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप 43 जागा जिंकेल आणि त्यातली 43 वी जागा बारामतीची असेल असं सांगत बारामती लोकसभेसाठी रणशिंग फुंकलं होतं. त्यामुळे बारामती लोकसभेसाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरु असल्याचं दिसत होतं. प्रत्यक्षात मात्र राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे यांनी निवडणुकीची तयारी सुरु केलेली असतानाही त्यांच्याविरोधात भाजपकडून उमेदवार कोण याबाबत चित्रच स्पष्ट नसल्याने संभ्रम निर्माण झालाय.

भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरुच..!

भाजपने बारामती लोकसभेची जागा जिंकण्याचा निर्धार जाहीर केलाय. मात्र अद्याप उमेदवार कोण हेच ठरलेलं नसल्याने युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. युतीमध्ये बारामती लोकसभेची जागा वर्षानुवर्षे भाजपकडे आहे. मात्र मागील निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत सुप्रिया सुळे यांना जोरदार टक्कर दिली होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. मात्र मागील निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता भाजपने कमळ चिन्हावर लढणारा उमेदवारच बारामतीत देण्याची मानसिकता ठेवली आहे. त्यामुळे महादेव जानकर यांच्या उमेदवारीबाबत भाजपकडून अद्याप कोणताच निर्णय जाहीर झालेला नाही.

माजी आमदार रंजना कुल किंवा कांचन कुलांच्या नावाचीही चर्चा

राष्ट्रीय समाज पक्षाचे दौंडमधील आमदार राहुल कुल यांच्यासह त्यांच्या पत्नी कांचन कुल आणि आई माजी आमदार रंजना कुल यांच्या नावाचीही भाजपकडून चाचपणी सुरु असल्याचं बोललं जातंय. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बारामती लोकसभा मतदारसंघातील बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी आमदार राहुल कुल यांनीही हजेरी लावत नरेंद्र मोदींचे आभार मानले होते. त्यामुळे आमदार राहुल कुल यांचा किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा बारामती लोकसभा निवडणुकीसाठी विचार सुरु असल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या उमेदवारीबाबतही निर्णय झालेला नाही.

दरम्यानच्या काळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशीही भाजपच्या स्थानिक नेत्यांनी बारामती लोकसभेबाबत बोलणी केल्याची चर्चा सुरु होती. मात्र याबाबत काहीही तथ्य नसल्याचं सांगत हर्षवर्धन पाटील यांनी या चर्चांना विराम दिला.

महादेव जानकर यांच्याबद्दल साशंकता

भाजपकडून वेगवेगळ्या नावांची चर्चा केली जात असली तरी उमेदवार कोण हे अद्याप निश्चित नाही. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही महादेव जानकर यांना डावलले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपकडून मातब्बर उमेदवार रिंगणात उतरणार की पुन्हा एकदा महादेव जानकर यांची एन्ट्री होणार याकडेच आता लक्ष लागले आहे.