ठाकरे सरकार दारु-पब संस्कृतीला प्राधान्य देतय : किरीट सोमय्या

| Updated on: Jan 19, 2020 | 5:30 PM

ठाकरे सरकार हे नाईट लाईफ चालू करून फक्त दारू आणि पब संस्कृतीला चालना देत आहेत, अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya criticized on Night Life) यांनी ठाकरे सरकारवर केली.

ठाकरे सरकार दारु-पब संस्कृतीला प्राधान्य देतय : किरीट सोमय्या
Follow us on

नवी मुंबई : ठाकरे सरकार हे नाईट लाईफ चालू करून फक्त दारू आणि पब संस्कृतीला चालना देत आहेत, अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya criticized on Night Life) यांनी ठाकरे सरकारवर केली. महाराष्ट्र सरकारमधील पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफ सुरु करत आहेत. ही नाईट लाईफ प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार आहे. मात्र या नाईट लाईफवर मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाकडून टीका (Kirit Somaiya criticized on Night Life) केली जात आहे.

“ठाकरे सरकार हे नाईट लाईफ सुरु करून फक्त दारू आणि पब संस्कृतीला चालना देत आहेत. ही नाईट लाईफ नाही, तर नाईट क्लब आहे”, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पनवेल येथे केला.

“नाईट लाईफचा कोणताही फायदा सर्वसामान्यांना होणार नाही. उच्चभ्रू लोकांसाठी ठाकरे सरकारने घेतलेला हा निर्णय आहे. यावरून ठाकरे सरकार हे कोणत्या निर्णयांना प्राध्यान्य देत आहे हे स्पष्ट झालं आहे”, असंही किरीट सोमय्या म्हणाले.

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी सुरु केलेल्या नाईट लाईफच्या निर्णयाचं सोशल मीडियावरुन अनेकजण समर्थन करत आहे. तर अनेकजण या निर्णयाच्या विरोधातही आहेत. येत्या 26 जानेवारीपासून प्रायोगीक तत्वावर नाईट लाईफ सुरु होणार आहे. तसेच पुण्यातही नाईट लाईफ सुरु करावी, अशी मागणी आता काही पुणेकरांकडून होत आहे.