पुणे : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी शिवसेना-भाजपने एकत्र यावं असं मत व्यक्त केल्यानंतर, आता भाजपमधूनही तशाच प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil positive about Shiv Sena) यांनीही शिवसेना-भाजप युतीबाबत मोठं विधान केलं आहे. “आम्ही आशावादी आहोत. भाजप, शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत. 30 वर्षांचे मित्र आहेत. आमचं रक्त हे हिंदुत्व समान आहे. पुन्हा एकत्र यावं, जनादेश दोघांना मिळाला होता. हा आशावाद आहे”, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. (Chandrakant Patil positive about Shiv Sena) ते पुण्यात बोलत होते.
हा केवळ आशावाद व्यक्त करतोय. आम्हाला अहंकार नाही. चर्चेची दारं त्यावेळीही खुली होती, मनोहर जोशींना जसं वाटतं सेना-भाजपने एकत्र यावं, तर स्वागतच आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?
चंद्रकांत पाटलांना पत्रकारांचा प्रश्न – मुनगंटीवार म्हणाले फडणवीस आणि अजित पवारांची माढ्यात आमदार संजय शिंदेंच्या मुलाच्या लग्नात भेट झाली, त्यामुळे गोड बातमी लवकर मिळेल. मनोहर जोशीही म्हणाले सेना-भाजप एकत्र यावेत, तर पुन्हा युती होण्याचे काही संकेत आहेत का?
चंद्रकांत पाटील यांचं उत्तर –
मला याची माहिती काहीच नाही. पण आशावाद नक्कीच आहे. भाजप आणि शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत. 30 वर्षांचे मित्र आहेत. एका अर्थाने रक्त, हिंदुत्व हे कॉमन आहे. त्यामुळे पुन्हा एकत्र यावं, एकत्र सरकार चालावं, एकत्र सरकार चालायला हवं होतं कारण जनादेश दोघांना कॉमन दिला होता. हा झाला आशावाद.. होणार आहे की नाही हे मला माहीत नाही.
चंद्रकांत पाटलांना प्रश्न – चर्चेसाठी दरवाजे खुले आहेत का?
चंद्रकांत पाटील यांचं उत्तर – चर्चेसाठी दरवाजे त्यावेळीही खुले होते आणि दरवाजे कशाला, आम्हाला अहंकार नसल्याने आमचा पुढाकार होता. येऊ दिलं नाही. पण तुमची माहिती अशी असेल, तर स्वागत आहे.
VIDEO : चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर उत्तम होईल, पण सध्या दोन्ही पक्ष त्या मानसिकतेत नाहीत, असं मनोहर जोशी म्हणाले. मनोहर जोशी यांनी हे आपलं वैयक्तिक मत असल्याचंही यावेळी नमूद केलं.
संबंधित बातम्या