नाशिक: जिहाद फक्त कुराणात नाही तर गीतेतही (geeta) आहे, असं विधान काँग्रेसचे (congress) ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी केल होतं. शिवराज पाटील चाकूरकर (shivraj patil chakurkar) यांच्या या विधानाचे पडसाद उमटले आहेत. शिवराज पाटील यांच्या या विधानाशी काँग्रेस सहमत आहे का? असा सवाल राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. आता या वादात भाजपच्या आध्यात्मिक आघाडीनेही उडी घेतली आहे. शिवराज पाटील यांचा डीएनए तपासा. तो मुघलांचाच असेल, अशी खवचट टीका भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.
भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. शिवराजी पाटील चाकूरकर यांचा डीएनए तपासा तो शंभर टक्के मुघलांचाच असेल. हिंदू विरोधी असणाऱ्यांना मोठ्या पदावर बसवण्याचं काम काँग्रेसने केलं आहे, असं आचार्य तुषार भोसले यांनी म्हटलं आहे.
शिवराज पाटील हे महाराष्ट्राच्या नावाल कलंक आहेत. त्यांच्या सगळ्या सरकारी सुविधा काढून घ्या. त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर हाकला, अशी मागणीही तुषार भोसले यांनी केली आहे.
दरम्यान, राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनीही शिवराज पाटील यांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. शिवराज पाटील यांचं हे विधान काँग्रेसला मान्य आहे का? काँग्रेस त्यांच्या विधानाशी सहमत आहे का? याचा खुलास काँग्रेसने करावा, अशी मागणी उदय सामंत यांनी केली आहे.
शिवराज पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. गीतेचा एक भाग महाभारतात सांगण्यात आला आहे. त्यामध्ये जिहाद आहे. महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला जिदाहच शिकवला होता, असं शिवराज पाटील म्हणाले होते. शिवराज पाटील यांच्या या विधानाचे पडसाद उमटत असून त्यांचा निषेध नोंदवला जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर शिवराज पाटील यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.