पुणे : “साप म्हणून भुई थोपटण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत” (Chandrakant Patil Advise To CM Uddhav Thackeray), असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. चंद्रकांत पाटलांनी आज पुणे पालिकेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी ‘टीव्ही-9 मराठी’शी बोलताना महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. “अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) हेडमास्तर आहेत, उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडून काहीतरी शिकावं”, असा सल्लाही चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना दिला (Chandrakant Patil Advise To CM Uddhav Thackeray).
“तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयन्त करत आहात. कोण म्हणतंय सरकार पडणार? आम्ही कुणीच म्हणत नाही. पोटदुखी आम्हाला झालेली नाही, म्हणून बाहेर फिरत आहोत. पोटदुखी झाली असेल, तर त्यांना झाली असेल, म्हणून त्यांच्या फिरण्यावर मर्यादा आल्या आहेत, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
अजित पवारांना पुणे आंदण दिलंय का? – चंद्रकांत पाटील
धारावी जवळपास दोन महिने भीतीच्या सावटाखाली होते ते विसरुन जायचं का?, असा सवाल चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला. शिवाय, अजित पवारांना पुणे आंदण दिलंय का, असा खोचक टोमणाही प्रदेशाध्यक्षांनी मारला.
“काही ठिकाणी अजित पवार मुख्यमंत्री, तर काही ठिकाणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री. अजित पवार हेडमास्तर आहेत, म्हणून उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांकडून काहीतरी शिकावं”, असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना दिला (Chandrakant Patil Advise To CM Uddhav Thackeray).
सरकारचं लक्ष बदल्यावर आहे का? – चंद्रकांत पाटील
“तिघे एकत्र येऊन लढा, भाजप त्याला घाबरत नाही आणि हे एकदा होऊन जाऊद्या. सरकारमध्ये ज्या कुरबुरी सुरु आहेत, त्या फक्त स्वतःच्या ताटात काहीतरी पाडून घेण्यासाठी सुरु आहेत”,असं म्हणत राज्यातील पुढील निवडणुका शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढवण्याबाबत सुरु असलेल्या चर्चांवर चंद्रकांत पाटलांही थेट महाविकास आघाडीला आव्हान दिलं आहे. ,
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे पालिकेत भेट देत महापौर आणि पालिकेच्या पदाधिकाऱ्यांसोबत कोरोनाचा आढावा घेतला. महापौरांच्या दालनात ही बैठक पार पडली. या बैठकीला महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष उपस्थित होते.
हिंमत असेल तर सरकार पाडा” मुख्यमंत्र्यांचं भाजपला आव्हान, फडणवीसांनाही टोलाhttps://t.co/kUWa28rAzB#Saamana #UddhavThackeray #SanjayRaut @rautsanjay61 @OfficeofUT @Dev_Fadnavis
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 24, 2020
Chandrakant Patil Advise To CM Uddhav Thackeray
संबंधित बातम्या :
Uddhav Thackeray : शरद पवारांच्या राम मंदिराच्या विधानावर उद्धव ठाकरे म्हणतात…