चौथीची पोरगी सांगेल, यांचं काही खरं नाही, फडणवीसांनी दोन तासात प्रश्न सोडवले असते : चंद्रकांत पाटील

| Updated on: Jul 02, 2020 | 2:54 PM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. Chandrakant Patil again slams thackeray govt

चौथीची पोरगी सांगेल, यांचं काही खरं नाही, फडणवीसांनी दोन तासात प्रश्न सोडवले असते : चंद्रकांत पाटील
Follow us on

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. “तुमच्यात मतभेद आहेत हे आम्ही बोलायचं नाही का? चौथीची पोरगी पण सांगेल की यांचं काही खरं नाही. कोरोना संकटात देवेंद्र फडणवीसांकडे जरी दिवसाचे दोन तास मागितले असते, तर त्यांनी कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला इगो आडवा येतोय”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. (Chandrakant Patil again slams thackeray govt)

“लॉक की अनलॉक अजून कळत नाहीत. आपापले मतभेद आणि गोंधळ संपत नाहीत. जेवढं लॉकडाऊनमध्ये कडक नव्हतं त्यापेक्षा जास्त गोंधळ अनलॉकमध्ये घालून ठेवला आहे. लोकांनी नेमकं करायचं तरी काय?”, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला.

“मुंबईत एवढे मूर्खपणाचे निर्णय घेत आहेत की काही बोलायलाच नको. आजार राहिला बाजूला पण सामान्य माणूस मात्र वैतागला आहे. आम्ही काही बोललो की जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील लगेच बोलतात सत्तेची हाव लागलीय. तुमच्यात मतभेद आहेत हे आम्ही बोलायच नाही का? चौथीची पोरगी पण सांगेल की यांचं काही खरं नाही”, असा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी केला. (Chandrakant Patil again slams thackeray govt)

फडणवीसांनी दोन तासात प्रश्न सोडवले असते

“मुख्यमंत्री किंवा सत्ताधाऱ्यांचा लोकांशी काहीच संबंध नाही. आम्ही सत्तेत असताना विरोधकांना तेव्हाही विचारात घेत होतो. एकट्या देवेंद्र फडणवीसांना जरी दिवसाचे दोन तास मागितले असते, तर त्यांनी कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला इगो आडवा येतोय”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“सत्तेची हाव इतकी होती की या खुर्चीला किती काटे आहेत ते आत्ता त्यांना जाणवायला लागलं आहे. पंढरपूरला गेलो तरी आक्षेप, नाही गेलो तरी आक्षेप. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादाचा फटका शिवसेनेला बसत असला, तरी सत्तेपायी तो त्यांना चालेलच. सत्तेची हाव मोठी आहे”, असा घणाघात चंद्रकांत पाटलांनी केला.

पंतप्रधान आढावा घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 4 तारखेला देशातील 7 राज्यांच्या कार्याचा आढावा घेणार आहेत. जिथे जिथे कोरोनाकाळात काम झालं, त्याचा संपूर्ण आढावा स्वत: पंतप्रधान घेणार आहेत, अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली.

शरद पवारांची चीनबद्दलची भूमिका ही मोदींच्या समर्थनार्थ होती, मात्र ती काँग्रेसला कशी पटेल? त्यांच्यातल्या वादाचा फटका हा शिवसेनेला बसतोच आहे. पण सत्तेपायी त्यांना तो चालतोय, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

(Chandrakant Patil again slams thackeray govt)

संबंधित बातम्या 

दोन किमी मध्येच फिरायचे की अर्थचक्र फिरवायचं? ‘भ्रमित ठाकरे’ सरकारने निर्णय घ्यावा : चंद्रकांत पाटील   

पवारांनी संरक्षण मंत्रिपदाच्या काळात चुका दुरुस्त करायला हव्या होत्या, इंदिराजींचा विजयही ते विसरले : नितीन राऊत