मुंबई – मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची वर्णी लागल्यानंतर पुढच्या मंत्रीपदाचं वाटप कसं होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. परंतु भाजपाला (BJP) 25 मंत्रीपद मिळणार आहेत, तर शिंदे गटाला 13 मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळाली आहे. दोन्ही गटात संगनमत झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोणात्या आमदाराला कोणतं खातं मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी महाराष्ट्रात ज्यावेळी सत्तेत आली त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांना महत्त्वाची खाती देण्यात आली. तर कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांना त्यांच्या मनासारखी खाती मिळाली नाहीत. त्यामुळे नाराजी असल्याचे अनेकदा उघडपणे मंत्र्यांनी बोलून देखील दाखवले होते. सध्या शिंदेगटासोबत देखील तेच होताना पाहायला मिळत आहे.
बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांना महाराष्ट्रात आले आणि त्याचं दिवशी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ज्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी शिंदे गटाला किती आनंद झाला. हे अवघ्या देशाने व्हिडीओच्या माध्यमातून पाहिले. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री दिल्यानंतर शिंदे गटात प्रचंड नाराजी दिसली होती. तसेच त्यांची नाराजी लपून राहिली नाही. दुसऱ्या दिवशी भाजपच्या बॅनरमधून ज्यावेळी अमित शहा यांचा फोटो हटवला त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होण्यापासून कोणी रोखलं हे देखील जनतेला समजलं.
एकनाथ शिंदे यांच्याकडची दोन्ही खाती त्यांच्याकडे ठेवण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे नगरविकास आणि एमएसआरडीसी खातं होतं. तर भाजपाकडे गृह, अर्थ, महसूल अशी महत्त्वाची खाती घेतली जाण्याची शक्यता आहे. नव्या मंत्रीमंडळात बच्चू कडू यांनी मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु राज्यमंत्री पद मिळणार की कॅबिनेट मंत्री मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भाजपच्या आमदारांना चांगली मंत्रीपद देण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. सध्या नव्या राज्य सरकारचा नवा मंत्री मंडळाचा फॉम्युला ठरला असून 25 मंत्रीपद ही भाजपला देण्यात येणार आहेत. तर 13 मंत्रीपद ही शिंदे गटाला देण्यात येणार आहे.