मुख्यमंत्र्यांच्या बारामती दौऱ्यापूर्वी शहरात भाजपविरोधात पोस्टरबाजी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

बारामती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्याच अनुषंगाने दावे-प्रतिदावे सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीची जागा जिंकण्याबद्दल वक्तव्य करत थेट पवार कुटुंबीयांनाच आव्हान दिलं. आता बारामतीत ठिकठिकाणी पोस्टरबाजी करत भाजपला बारामतीत थारा नसल्याचा संदेश देण्यात आलाय. ‘बारामतीत गोडसेचा पुनर्जन्म होणार नाही, बारामतीत कमळ फुलणार नाही,’ अशा आशयाचे फलक ठिकठिकाणी […]

मुख्यमंत्र्यांच्या बारामती दौऱ्यापूर्वी शहरात भाजपविरोधात पोस्टरबाजी
Follow us on

बारामती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्याच अनुषंगाने दावे-प्रतिदावे सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीची जागा जिंकण्याबद्दल वक्तव्य करत थेट पवार कुटुंबीयांनाच आव्हान दिलं. आता बारामतीत ठिकठिकाणी पोस्टरबाजी करत भाजपला बारामतीत थारा नसल्याचा संदेश देण्यात आलाय. ‘बारामतीत गोडसेचा पुनर्जन्म होणार नाही, बारामतीत कमळ फुलणार नाही,’ अशा आशयाचे फलक ठिकठिकाणी लावण्यात आलेत. अज्ञात व्यक्तींनी लावलेल्या या फलकांमुळे बारामतीतलं वातावरण ढवळून निघालंय. त्यातच शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारामतीत येत असतानाच हे फलक लागल्याने त्यांना तर हा इशारा नाही ना, असाही सवाल उपस्थित होऊ लागलाय.

बारामती शहरातील वर्दळीच्या परिसरात बारामतीत गोडसेचा पुनर्जन्म होणार नाही, बारामतीत कमळ फुलणार नाही… असा मजकूर असलेले फलक लावण्यात आलेत.. हे फलक कोणी लावले याचा कसलाच थांगपत्ता लागलेला नाही.. या फलकांमुळे बारामतीतलं राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय.. शहरातील बारामती नगरपरिषद, पंचायत समिती, प्रशासकीय भवन अशा अनेक ठिकाणी हे फलक लागलेत.. विशेष म्हणजे या फलकाची छायाचित्रेही वेगात व्हायरल झाल्याने राज्यभर चर्चेचा विषय ठरलाय.

दरम्यान, या फलकांबाबत बारामतीकर नागरिकांनी सहमती दर्शवली. गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीकर पवार कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेत. त्यांच्यामुळे या शहराचा विकास झालाय. निवडणुका आल्या की विरोधकांना बारामतीची आठवण येते.. त्यामुळे इथे स्वत: मुख्यमंत्री उभे राहिले तरी काहीही फरक पडणार नाही, असंही इथल्या युवकांना वाटतं.

बारामतीकर नेहमीच पुरोगामी विचारांना पाठींबा देतात. नथुराम गोडसे याचं बारामतीत वास्तव्य होतं, मात्र त्याच्या विचारांना बारामतीकर कधीच थारा देत नाहीत.. त्यामुळे अशा स्वरुपाच्या फलकांद्वारे बारामतीकरांनी आपलं मत मांडल्याचं संभाजी ब्रिगेडचे कोषाध्यक्ष अमोल काटे यांनी सांगितलं.

पुण्यात मागील काही दिवसांपूर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह भाजप नेत्यांना टोला लगावणारे फलक जागोजागी लावण्यात आले होते. त्यानंतर नथुराम गोडसेच्या बारामतीशी असलेल्या संबंधांचा दाखला देत लावलेल्या फलकांद्वारे     बारामतीकर भाजपला थारा देणार नाहीत, असाच संदेश दिल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.