मोठी बातमी: प्रक्षोभ शांत होऊ देणार नाही, मराठा मोर्चात ताकदीने उतरणार, भाजपची घोषणा

| Updated on: May 17, 2021 | 3:00 PM

आम्ही मराठा समाजाचा प्रक्षोभ शांत होऊ देणार नाही. | Maratha Reservation

मोठी बातमी: प्रक्षोभ शांत होऊ देणार नाही, मराठा मोर्चात ताकदीने उतरणार, भाजपची घोषणा
मराठा आरक्षण आंदोलन, फाईल फोटो
Follow us on

पुणे: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता राज्यभरात होऊ घातलेल्या आंदोलनांबाबत (Maratha Morcha) भाजपने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात भाजपचे (BJP) कार्यकर्ते सहभागी होतील. भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी ही माहिती दिली. (BJP will take part in Maratha agitation in Maharashtra)

ते सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप मराठा आंदोलनात सहभागी होणार असल्याची घोषणा केली. मराठा समाजाच्या नावाने आणि नेतृत्वात जी आंदोलने होतील त्यामध्ये भाजप पक्षीय ओळख बाजूला ठेवून सहभागी होईल, असे जगदीश मुळीक यांनी सांगितले. महाविकासआघाडी सरकार मराठा समाजाचा प्रक्षोभ दडपण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भाजप हा डाव हाणून पाडेल, असे जगदीश मुळीक यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच मराठा समाजाला देण्यात आलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द ठरवले होते. त्यानंतर राज्यातील अनेक मराठा नेत्यांनी आंदोलनाची हाक दिली होती.

यापूर्वी फडणवीस सरकारच्या काळात कोणतेही राजकीय पाठबळ नसताना मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यभरात प्रचंड मोठे मोर्चे काढण्यात आले होते. या सर्व मोर्चांमध्ये मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी असूनही योग्य नियोजनामुळे हे मोर्चे शांततापूर्ण पद्धतीने पार पडले होते. आता यामध्ये भाजप सहभागी झाल्यास मराठा आंदोलकांची ताकद आणखी वाढणार आहे. त्यामुळे आगामी काळात या सगळ्या घडामोडींचे राज्यात काय पडसाद उमटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नाही, मंत्र्यांना फिरु देणार नाही: मेटे

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नाही, तीव्र आंदोनल करण्यात येईल. मंत्र्यांना फिरू देणार नाही त्यांच्या गाड्या अडवणार. महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. येत्या 18 मे रोजी राज्यभर तहसीलदारांना निवेदन देणार तसेच 5 जूनच्या आसपास मोर्चा काढणार असल्याची घोषणा शिवसंग्राम संघटनेचे नेत विनायक मेटे यांनी केली आहे.

मराठा समाजाची मुस्कटदाबी करण्यासाठी राज्य सरकारने 15 दिवस लॉकडाऊन वाढवला. देवेंद्र फडणवीस यांना सांगून राज्यातील मराठा आरक्षणाबाबत कळकळ आहे. अशा सर्व मराठा नेत्यांना घेऊन राष्ट्रपतींना भेटणार असल्याचेही विनायक मेटे यांनी सांगितले होते.

संबंधित बातम्या:

Maratha Reservation: केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षण द्या, उद्धव ठाकरेंचे नरेंद्र मोदींना पत्र

“मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी मोदी सरकारची; फडणवीसांनी भूलथापा देऊन फसवणूक केली”

‘अशोक चव्हाण यांनी स्वत:ला मराठा म्हणून घेऊ नये’, मराठा आरक्षणावरुन नरेंद्र पाटलांचा घणाघात

(BJP will take part in Maratha agitation in Maharashtra)