कोल्हापूर: राज्यातील 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या जागेसाठी मतदान पार पडत आहे. या 6 जागाही आम्हीच जिंकणार असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. या जागांवर चुरस आहे पण विजयाची खात्री असल्याचा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. इतकच नाही तर पुण्याची जागा तर वनवे असल्याचंही पाटील म्हणालेत. (BJP will win 6 seats in the Legislative Council, claims Chandrakant Patil)
पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानासाठी चंद्रकांत पाटील कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. ‘पुणे पदवीधर मतदारसंघात आपण दोन वेळा आमदार झालो आहोत. तेव्हा उमेदवार स्ट्रॉंग होते. आता तर उमेदवार विक आहे. अरुण लाड यांना घरचा रस्ता दाखवण्याचाच हा मार्ग आहे’, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
पदवीधरचा आमदार असताना आपण केलेल्या कामाची यादी मोठी असल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केलाय. विरोधकांना मुद्दाच नाही. झोपलेल्याला उठवता येतं पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला उठवता येत नसल्याची टीका पाटील यांनी महाविकास आघाडीवर केलीय. पुणे पदवीधर हा 36 वर्षे आमचा गड राहिला आहे. आताही तो कामय राहिल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केलाय.
महाविकास आघाडीचं सरकार नसतं तर आज जंयत पाटील भाजपमध्ये दिसले असते असा दावा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केलाय. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची याबाबत बोलणीही झाली होती. पाटलांच्या इस्लामपुरात जाऊन हे सर्व आपण उघड करणार असल्याचंही राणे म्हणाले. याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता त्यांनी बोलणं टाळलं. आपण सामान्य माणूस आहोत. वरच्या पातळीवर काय चालतं ते आपल्याला माहिती नसल्याचं पाटील म्हणाले.
बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलविण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यावर भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बॉलिवूड असो किंवा इतर सांस्कृतिक क्षेत्र यात काम करायला मोठी संधी आहे. अशी कामं होत असतील तर त्याला प्रोत्साहनच दिलं पाहिजे, असं विधान बापट यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
संबंधित बातम्या:
girish bapat ! बॉलिवूड उत्तर प्रदेशात जाणार?; गिरीश बापट म्हणतात…
BJP will win 6 seats in the Legislative Council, claims Chandrakant Patil