जळगावात नेमकं काय घडलं, ज्यामुळे संकटमोचक स्वतःच संकटात आले

| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

जळगाव : भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेले मंत्री गिरीश महाजन स्वतःच संकटात आले. जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये भाजपच्या सभेत तुफान राडा झाला. भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी माजी आमदार बीएस पाटील यांना व्यासपीठावरच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. विशेष म्हणजे बाजूलाच असलेल्या गिरीश महाजनांनाही या गोंधळात धक्काबुक्की झाली. जळगावमध्ये भाजपची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. अमळनेरमध्ये भाजपच्या […]

जळगावात नेमकं काय घडलं, ज्यामुळे संकटमोचक स्वतःच संकटात आले
Follow us on

जळगाव : भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेले मंत्री गिरीश महाजन स्वतःच संकटात आले. जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये भाजपच्या सभेत तुफान राडा झाला. भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी माजी आमदार बीएस पाटील यांना व्यासपीठावरच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. विशेष म्हणजे बाजूलाच असलेल्या गिरीश महाजनांनाही या गोंधळात धक्काबुक्की झाली.

जळगावमध्ये भाजपची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. अमळनेरमध्ये भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि अमळनेरचे माजी आमदार बी.एस.पाटील यांच्यात फ्री स्टाईल मारहाण झाल्याचं पाहायला मिळालं. हा सर्व राडा सुरु झाल्यानंतर गिरीश महाजन यांनीही यात उडी घेतली आणि कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला.

आधी विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांचं तिकीट कापून भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी स्मिता वाघ यांचंही तिकीट कापलं. पण आता या तिकिट कापाकापीनंतर भाजपमध्ये अंतर्गत राजकारण चांगलंच पेटल्याचं चित्र आहे. त्याचा परिणाम म्हणून भर सभेत भाजप जिल्हाध्यक्षाने पक्षाच्या माजी आमदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचं आणि बेबंद कार्यकर्त्यांना गिरीश महाजनांनाही धक्काबुक्की केल्याचं पाहायला मिळालं.

काय आहे नेमका वाद?

गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अमळनेरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा होता. चार दिवसांपूर्वी बीएस पाटील यांनी एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं, असा उदय वाघ यांचा आरोप आहे. याचाच राग मनात धरुन त्यांनी व्यासपीठावरच मारहाण सुरु केली. भावना अनावर झाल्याने हा प्रकार झाल्याचं उदय वाघ यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं. शिवाय हा सर्व प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय.

VIDEO : मारहाणीचा व्हिडीओ