मुंबई : माजी मंत्री आणि भाजप नेते संजय देवतळे (Sanjay Deotale), तसेच काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार चंद्रकात रघुवंशी (Chandrakant Raghuvanshi) यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधलं. चंद्रकांत रघुवंशी यांच्या शिवसेना प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रात विशेषत: धुळे-नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. तर संजय देवतळे यांना शिवसेनेने चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली.
संजय देवतळे हे 3 टर्म आमदार होते. मात्र गेल्या निवडणुकीत भाजपकडून लढलेल्या संजय देवतळे यांचा तत्कालिन शिवसेनेचे उमेवार बाळू धानोरकर यांनी पराभव केला. सध्या बाळू धानोरकर हे काँग्रेसमध्ये आहेत. वरोरा विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे. त्यामुळे संजय देवतळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
चंद्रकात रघुवंशी