मुंबई : भाजपने 2022 मधील मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने दोन वर्ष आधीपासूनच सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेतेपदी प्रभाकर शिंदे आणि भाजपच्या महापालिका गटनेतेपदासाठी विनोद मिश्रा यांची नियुक्ती झाल्यानंतर आता माजी नगरसेवकाला मैदानात उतरवण्यात येत आहे. भाजपने नामनिर्देशित नगरसेवक गणेश खणकर यांचा राजीनामा घेतला आहे. त्यांच्या जागी पक्षाचे प्रभारी म्हणून नेमणूक झालेले माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांना अधिकृत प्रवेश देण्यात येणार आहे. (BMC ex Councillor to get chance)
भाजपचे नामनिर्देशित सदस्य आणि उत्तर मुंबईच्या भाजपच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झालेल्या गणेश खणकर यांच्याकडून तडकाफडकी राजीनामा मागून घेण्यात आला. गणेश खणकर यांनीही पक्षादेश शिरसावंद्य मानत महापालिका सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
महापालिका निवडणूक निकालानंतर मार्च महिन्यात पक्षाच्या कोट्यानुसार नामनिर्देशित सदस्यांची नावं जाहीर करण्यात आली होती. भाजपचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी बीएमसीमध्ये नामनिर्देशित सदस्य म्हणून गणेश खणकर आणि श्रीनिवास त्रिपाठी यांच्या नावाची घोषणा केली होती. त्रिपाठींची कामगिरी पाहता त्यांचा राजीनामा घेतला जाण्याची दाट शक्यता होती, परंतु उत्तर भारतीय व्होटबँकसाठी खणकरांचा बळी घेतल्याची चर्चा आहे.
नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यानंतर भालचंद्र शिरसाट यांची वर्णी स्थायी समितीवर लावली जाण्याची चर्चा आहे. महत्त्वाच्या समित्यांमध्येही ते सदस्य असतील. नामनिर्देशित सदस्यांना मतदानाचा अधिकार नसला, तरी भाजपचे दोन सदस्य हे कायम गैरहजर असतात. त्यामुळे शिरसाटांना स्थायी समितीच्या कारभारात प्रत्यक्ष सहभागी करुन घेतले जाणार आहे. (BMC ex Councillor to get chance)
भाजपचे फेरबदल काय?
उज्ज्वला मोडक आणि रिटा मकवाना यांची महापालिकेत उपनेतेपदी निवड झाली आहे. विनोद मिश्रा यांची गटनेतेपदी वर्णी लागली आहे. तर सुनील यादव यांची मुख्य प्रतोद म्हणून भाजपने नियुक्ती केली आहे.
मुंबई महापालिका संख्याबळ –
BMC ex Councillor to get chance