मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत पालिका (Richest municipality in India) म्हणून बीएमसी (BMC) ओळखली जाते. या पालिकेचा स्थायी समिती अध्यक्षांची श्रीमंती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची केवळ दोन वर्षात तब्बल 38 फ्लॅट आणि ऑफिस मालमत्तांची खरेदी (Yashwant Jadhav Property purchase) केल्याचं समोर आलं आहे. स्थायी समिती अध्यक्ष झाल्यापासून जाधवांच्या संपत्तीत घसघशीत वाढ झाली असल्याचे आरोप केले जात होते. अशातच मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केवळ दोन वर्षात तब्बल 38 ठिकाणी वेगवेगळ्या प्रॅापर्टी खरेदी केल्याचा धक्कादायक अहवाल टीव्ही 9 मराठीच्या हाती लागलाय. यशवंत जाधव आणि त्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अगरवाल यांनी मुंबईत सुमारे 38 मालमत्तांची खरेदी केलेली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या निकटवर्तीय अगरवाल यांनी मुंबईत सुमारे 38 मालमत्तांची खरेदी केलेली आहे. केवळ दोन वर्षांत हे सर्व आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काही चुकांमुळे Congress कमकुवत झालीय, सुशीलकुमार शिंदे यांचा पक्षाला आत्मचिंतन करण्याचा सल्ला
Ulhasnagar मध्ये धुळवडीच्या दिवशी हत्याकांड! दारु पिऊन पडून नव्हे, तर डोक्यात वीट घालून हत्या