मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) तिजोरीच्या चाव्या कुणाकडे असणार, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे. मुंबई महापालिकेतील स्थायी समितीसह इतर सात समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका उद्यापासून सुरु होत आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि भाजप या तिन्ही प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार उभे केल्याने ही निवडणूक चुरशीची झाली आहे. (BMC Standing Committee Election Shivsena Vs BJP Vs Congress)
महापालिकेत स्थायी समितीच्या निवडणुकीत उद्या काँग्रेस ऐन वेळी माघार घेईल, असं सूचक वक्तव्य शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. तसंच केवळ स्थायी समितीच नाही तर सर्वच समित्यांवर शिवसेनेचाच अध्यक्ष निवडून येईल आणि शिवसेनेचा बीएमसीतील गड अबाधित राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
काय म्हणाले अनिल परब?
राज्यात काँग्रेस आणि शिवसेनेची महाविकास आघाडी आहे, हे भाजपने कायम ध्यानात ठेवलं पाहिजे. त्यामुळे मुंबई महापालिकेत जरी काँग्रेस विरोधी बाकांवर असली, तरी सेनेला त्यांची अडचण नाही, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं.
भाजप आधी पहारेकरी होते आणि आता आक्रमक होत आहेत. मात्र शिवसेनेचा जन्मच आक्रमकतेतून झाला आहे, हे कुणीही विसरु नये. मुंबई महापालिकेतील स्थायी समिती आणि इतर सर्व समित्यांच्या अध्यक्षपदी शिवसेनेचाच अध्यक्ष बसणार, असा विश्वास परबांनी व्यक्त केला.
मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल
(BMC Standing Committee Election Shivsena Vs BJP Vs Congress)
Sushant Singh Rajput Case | सुशांतच्या तपासादरम्यान छाती बडवणारे आता कुठे? अनिल परबांचा आठवले-कंगनावर निशाणाhttps://t.co/shmFv535Qq@advanilparab #SushantSinghRajput #AIIMSreport #MumbaiPolice
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 4, 2020
दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर एम्सच्या अहवालानंतर (AIIMS report) शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. सुशांतचा मृत्यू हत्या नसून, आत्महत्याच असल्याचा दावा एम्सच्या पथकाने केला आहे. यावरुन अनिल परब यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ‘सुशांत प्रकरणाच्या तपासा दरम्यान छाती बडवून घेणारे आता बोलणार का?’, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे
संबंधित बातम्या :
‘पुढचा महापौर आमचा’ नारा दिल्यानंतर भाजपचं शिवसेनेची डोकेदुखी वाढवणारं पाऊल
(BMC Standing Committee Election Shivsena Vs BJP Vs Congress)