सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा

| Updated on: Aug 07, 2019 | 8:43 AM

सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री निधन दिल्लीतील एम्समध्ये निधन झालं. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्येही शोककळा पसरली आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा
Follow us on

मुंबई : सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री निधन दिल्लीतील एम्समध्ये निधन झालं. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्येही शोककळा पसरली आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छातीत अचानकपणे दुखू लागल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. स्वराज यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण त्यांची झुंज अपयशी ठरली. स्वराज यांच्या निधनाने देशावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. तसेच बॉलिवूडमध्येही सुषमा स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे.

अमिताभ बच्चन

खूप दुख:द बातमी आहे. एक प्रबळ राजकीय नेत्या, अप्रतिम व्यक्तिमत्व, अद्भुत प्रवक्त्या. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही प्रार्थना, असं ट्वीट ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केलं

अनुपम खेर

अभिनेता अनुपम खेर यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी ऐकून त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ते एका कॅबमध्ये बसलेले आहेत आणि व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली दिली आहे.

जावेद अख्तर

सुषमाजी यांच्या निधनामुळे मला खूप दुख: झाले आहे. तुम्ही एक असामान्य व्यक्ती होतात. आम्ही तुमचे कायम ऋणी आहोत, असं ट्वीट दिग्गज गीतकार जावेद अख्तर यांनी केलं.

शबाना आजमी

सुषमाजी यांच्या निधनाने खूप दुख: झाले आहे. आमचे राजकीय विचार परस्पर विरोधी असूनही आमच्यात चांगले नातेसंबंध होते. जसे की, त्यांनी आपल्या प्रसारण मंत्रालयाच्या कार्यकाळ दरम्यान म्हटले होते की, मी त्यांची एक नवरत्न आहे आणि त्यांनी चित्रपटसृष्टीला इंडस्ट्रीचा दर्जा दिला. प्रखर व्यक्तिमत्व. देव त्यांच्या आत्म्यास शांदी देवो, असं ट्वीट अभिनेत्री शबाना आझमी यांनी केलं.

सनी देओल

सुषमाजी यांच्या निधनाने मी सांत्वन करतो. आपल्या देशातील सर्वात चांगल्या नेत्यांमधील सुषमा स्वराज या एक होत्या. मी नेहमी त्यांची आठवण काढेन. त्यांच्या कुटुंबियांसाठी मी प्रार्थना करतो, असं ट्वीट अभिनेता सनी देओल याने केलं.

रितेश देशमुख

सुषमाजी आम्ही तुमची नेहमी आठवण काढू. तुमच्या आत्म्यास शांती लाभो, असं ट्वीट अभिनेता रितेश देशुमखने केलं.

स्वरा भास्कर

सुषमाजी यांच्या आत्म्यास शांती लाभो. एक सर्वोत्कृष्ट खासदार आणि परराष्ट्र मंत्री म्हणून सुषमा स्वराज प्रेरणादायी होत्या. माझे त्यांच्या विचारधारेसोबत मतभेत होते, पण मी त्यांच्या संकल्प आणि कार्याचे खूप कौतुक करते, असं ट्वीट अभिनेत्री स्वरा भास्कर हीने केलं.

हंस राज हंस

मी सुषमा स्वराज यांची निधनाची बातमी ऐकून खूप दुखी आहे. सुषमा स्वराज यांची नेहमी आठवण येईल. त्या खूप विशेष आणि देशातील मोठ्या सन्मानीत नेत्या होत्या, असं ट्वीट गायक हंस राज हंस यांनी केलं.

बमन इराणी

बमन इराणी यांनी ट्वीट करत म्हटले, खूप कमी वयात त्यांचे निधन झाले. ही बातमी ऐकून मी खूप दुखी आहे. त्यांच्या जाण्याने आपल्याला देशाचे नुकसान झालं आहे, असं ट्वीट अभिनेता बमन इराणी यांनी केलं.

रवीना टंडन

एकता कपूर 

आयुष्मान खुराणा