पाटना: बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नितीश कुमार यांनी राजकीय संन्यास घेण्याचीच घोषणा केल्याची चर्चा आता राष्ट्रीय राजकारणात सुरु झाली आहे. धमदाहामधील आपल्या उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना नितीश कुमार यांनी ही घोषणा केली आहे. (Bihar assembly election 2020: Nitish kumar announce this is my last election!)
बिहार विधानसभा निवडणुकीच्या शेटवच्या टप्प्यातील प्रचार आज थंडावला. यावेळी धमदाहामध्ये आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेल्या नितीश कुमार यांनी जाहीर सभेत राजकीय संन्यासाची घोषणाच करुन टाकली. “आज तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आता परवा मतदान आहे आणि ही माझी शेवटची निवडणूक आहे. अंत भला तो सब भला”, असं वक्तव्य नितीश कुमार यांनी केलं.
This is my last election, says Bihar CM and JD(U) Chief Nitish Kumar during an election rally in Purnia#BiharElections2020 pic.twitter.com/vLSL4uQd4v
— ANI (@ANI) November 5, 2020
नितीश कुमार हे ६ वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. नितीश कुमार यांनी 2004 मध्ये शेवटची निवडणूक लढवली होती. ज्यात त्यांनी नालंदामधून विजय मिळवला होता. त्यानंतर नितीश कुमार यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. 2005 मध्ये नितीश कुमार NDAची सत्ता आल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री बनले. त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत बिहार विधान परिषदेचे सदस्यता स्वीकारली.
नितीश कुमार यांनी 1977 मध्ये आपली पहिली निवडणूक लढवली होती. त्यांनी नालंदाच्या हरनौत मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी 4 वेळा निवडणूक लढली. त्यात 1977 आणि 1980 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर 1985 आणि 1995 च्या निवडणुकीत ते विजयी झाले होते.
नितीश कुमार यांनी 1972 मध्ये बिहार इंजीनिअर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी काही काळ बिहार स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डात नोकरीही केली होती. मात्र, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहियांसारख्या नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार आज थंडावला. JDUचे अध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, RJDचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी आज जोरदार प्रचार केला.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात 15 जिल्ह्यातील 78 मतदारसंघात 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 1 हजार 208 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानासह वाल्मिकीनगर लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे. याठिकाणी 7 उमेदवार रिंगणात आहेत.
शेतकऱ्यांसाठी NDA चं जेवढं काम, तेवढं आतापर्यंत कुणाचंच नाही, पंतप्रधान मोदींचा दावा
ईव्हीएम नव्हे या तर ‘मोदी व्होटिंग मशिन्स’; राहुल गांधींनी साधला भाजपवर निशाणा
Bihar assembly election 2020: Nitish kumar announce ‘this is my last election’!