BMC election 2022 Ward No 122 Hiranandani Garden : भाजप गड राखणार की शिवसेना, राष्ट्रवादी बाजी मारणार? वॉर्ड क्रमांक 122 चे नेमके चित्र काय ? जाणून घ्या

| Updated on: Jun 08, 2022 | 12:15 AM

वॉर्ड क्रमांक 122 हा मोठ्या प्रमाणावर विस्तारलेला प्रभाग आहे. त्यात या मतदारसंघात मराठी मतदारांबरोबरच अमराठी मतांचा टक्काही लक्षणीय आहे. या मतदारसंघात हिरानंदानी गार्डन, पंचकुटीर यांसारख्या हायप्रोफाईल भागांचा अंतर्भाव आहे. तसेच साईनाथ नगर, गणेश नगर, म्हाडा कॉलनी, जलवायू विहार, रमाबाई आंबेडकर नगर या ठिकाणांचा समावेश आहे.

BMC election 2022 Ward No 122 Hiranandani Garden : भाजप गड राखणार की शिवसेना, राष्ट्रवादी बाजी मारणार? वॉर्ड क्रमांक 122 चे नेमके चित्र काय ? जाणून घ्या
भाजप गड राखणार की शिवसेना, राष्ट्रवादी बाजी मारणार?
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक (Election) जाहीर झाली आहे. या निवडणुकीत सर्वच पक्ष जोरदार तयारीने रिंगणात उतरत आहेत. देश पातळीवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असतानाच ही निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. निवडणूक कार्यक्रमांतर्गत नुकतीच आरक्षण सोडत जाहीर झाली आहेत. त्यात काहींना अपेक्षित आरक्षण न आल्याने निराशा पदरी पडली आहे. अपेक्षाभंग झालेले ते उमेदवार आता सुरक्षित व आपल्याला हव्या असलेल्या प्रभागांचा शोध घेत आहेत. अशा उमेदवारांना पक्षाच्या दृष्टीने सुरक्षित असलेल्या मतदारसंघात तिकिट (Ticket) दिले जाण्याची शक्यता आहे. अशा तगड्या उमेदवारांची काही ठिकाणी विरोधी पक्षासाठी विजयाची लॉटरी ठरू शकणार आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. वॉर्ड क्रमांक 122 मध्येही अटीतटीची लढत अपेक्षित आहे. एस भांडुप या मतदारसंघात देखील मराठी मतदारां (Marathi Voters)ची संख्या अधिक आहे. त्यामुळे मराठी बाणा इथे कामी येऊ शकतो. याच अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मराठी तगडा उमेदवार या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे.

मागच्या निवडणुकीतील मतांची स्थिती

वॉर्ड क्रमांक 122 मध्ये एकूण मतदारांची संख्या 59031 इतकी आहे. त्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील मतदार 5167 इतके आहेत. तर अनुसूचित जमातीच्या मतदारांची संख्या 359 इतकी आहे. 2017च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या वैशाली श्रीकांत पाटील यांनी विजय मिळवला होता. त्यांना 4942 मतदारांनी मते दिली होती. त्यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली होती. त्यात भाजपने बाजी मारली होती. दुसरे स्थान पटकावलेल्या राष्ट्रवादीच्या जया हनुमंता वेंकटगिरी यांना त्यावेळी 4220 मते मिळाली होती. तसेच मनसेच्या सुजाता अश्विन चव्हाण यांना 318 मते, अपक्ष उमेदवार सुरेखा सुरेश चव्हाण यांना 542 मते, काँग्रेसच्या अंजली वसंत दराडे यांना 1552 मते, शिवसेनेच्या स्नेहल दिपक मांडे यांना 3749 मते, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीला 359 मते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला (मार्क्सवादी) 655 मते मिळाली होती. त्याचबरोबर 378 नोटा मते नोंदवली गेली होती.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनानिधी प्रमोद शिंदे 4,485 मतं
भाजपरुक्मिणी विठ्ठल खरटमोल3,256 मतं
काँग्रेसउषा अनिल कांबळे 1,333 मतं
राष्ट्रवादीरेशा मधुकर शिससाट1,716 मतं
मनसेशोभा अशोक शानभाग1,009 मतं
अपक्ष/ इतर

वॉर्डमध्ये कोणकोणत्या ठिकाणांचा समावेश

वॉर्ड क्रमांक 122 हा मोठ्या प्रमाणावर विस्तारलेला प्रभाग आहे. त्यात या मतदारसंघात मराठी मतदारांबरोबरच अमराठी मतांचा टक्काही लक्षणीय आहे. या मतदारसंघात हिरानंदानी गार्डन, पंचकुटीर यांसारख्या हायप्रोफाईल भागांचा अंतर्भाव आहे. तसेच साईनाथ नगर, गणेश नगर, म्हाडा कॉलनी, जलवायू विहार, रमाबाई आंबेडकर नगर या ठिकाणांचा समावेश आहे. मतदारसंघात अनेक ठिकाणी नागरी सुविधांचा बोजवारा उडालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर समस्यांवर बोट ठेवून शिवसेना किंवा राष्ट्रवादी हे पक्ष भाजपकडील विजयाची पताका हिसकावून घेतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

एकूण मतदार – 59031
एससी – 5167
एसटी – 359