BMC election 2022 Ward No 93 Government Colony Bandra : शिवसेना बाल्लेकिल्ला कायम राखणार कि भाजप डोके वर काढणार? जाणून घ्या वॉर्ड क्रमांक 93 ची राजकीय गणित

| Updated on: Jun 09, 2022 | 6:51 PM

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे 'मातोश्री' निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात हा वॉर्ड मोडतो. सध्या या प्रभागात शिवसेनेच्या रोहिणी योगेश कांबळे ह्याच प्रतिनिधित्व करत होत्या. त्यांनी केलेल्या विकासकामांचा फायदा होऊन बालेकिल्ल्यातील हा प्रभाग शिवसेना आपल्याच ताब्यात ठेवतो कि प्रतिस्पर्धी भाजप डोके वर काढतो, हे चित्र निवडणूक निकालातून स्पष्ट होणार आहे.

BMC election 2022 Ward No 93 Government Colony Bandra : शिवसेना बाल्लेकिल्ला कायम राखणार कि भाजप डोके वर काढणार? जाणून घ्या वॉर्ड क्रमांक 93 ची राजकीय गणित
मुंबई महापालिका
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : यंदा मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीपासून राजकीय चित्र पूर्णतः पालटले आहे. त्याचे पडसाद मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळणार एवढे नक्की. एकेकाळी सख्खे मित्रपक्ष असलेले शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) पक्ष आता कडवी दुश्मनी असल्यासारखे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्या पार्श्वभूमीवर यंदाची महापालिका निवडणूक (BMC Election) अटीतटीची होणार असून त्याकडे संपूर्ण देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागणार आहे. दोन वर्षांवर लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने या निवडणुकीकडे अधिक गांभीर्याने पहिले जात आहे. या निवडणुकीत काही प्रभाग फार लक्षवेधी असतील. त्यात शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वांद्रे पूर्वेकडील वॉर्ड क्रमांक 93 चाही समावेश असेल.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे ‘मातोश्री’ निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात हा वॉर्ड मोडतो. सध्या या प्रभागात शिवसेनेच्या रोहिणी योगेश कांबळे ह्याच प्रतिनिधित्व करत होत्या. त्यांनी केलेल्या विकासकामांचा फायदा होऊन बालेकिल्ल्यातील हा प्रभाग शिवसेना आपल्याच ताब्यात ठेवतो कि प्रतिस्पर्धी भाजप डोके वर काढतो, हे चित्र निवडणूक निकालातून स्पष्ट होणार आहे.

मागच्या निवडणुकीत काय घडले?

मुंबई महापालिकेच्या 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप वगळता इतर प्रमुख राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी 21147 एवढ्या वैध मतांची नोंद झाली होती. त्या निवडणुकीत विजयी झालेल्या रोहिणी योगेश कांबळे यांच्या मतांचा आकडा पाहिला तर त्या तुलनेत विरोधी पक्षांना निम्माही आकडा गाठता आलेला नाही. शिवसेनेच्या रोहिणी कांबळे यांना तब्बल 9986 मते मिळाली होती, तर दुसऱ्या क्रमांकाची 2748 एवढी मते ही राष्ट्रीय काँग्रेसच्या डॉ. प्रियतमा सावंत आणि रिपब्लिकन पार्टीच्या राणी सुमित वजाळे यांना मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नंदा संदेश आयकर यांनी 2022 मते मिळवली होती. यंदा भाजपच्या भूमिकेवर राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा

महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय (bmc election result 2017 winner)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनारोहिणी योगेश कांबळेरोहिणी योगेश कांबळे
भाजप--
राष्ट्रवादी काँग्रेस--
काँग्रेसडॉ. प्रियतमा सावंत-
मनसेनंदा संदेश आयकर-
अपक्ष / इतरराणी सुमित वजाळे-

मतदारसंघातील सध्याच्या समस्या

हा मतदारसंघ मुंबईतील प्रमुख विभागांमध्ये मोडतो. मात्र इथल्या मतदारांना अजूनही काही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रस्ते चांगल्या प्रकारचे आहेत. परंतु पावसाळ्यात इथल्या जनतेला पाणी तुंबण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. ह्या समस्येतून कायमचा तोडगा काढला जावा, अशी प्रमुख मागणी इथले मतदार करीत आहे.

वॉर्ड आरक्षित कि खुला?

यंदाच्या निवडणुकीत हा वॉर्ड खुला अर्थात सर्वसाधारण उमेदवारांसाठी खुला आहे. शिवसेनेच्या नगरसेविका रोहिणी कांबळे यांनी केलेल्या विकासकामांचा विचार करता पक्षाकडून पुन्हा त्यांनाच संधी दिली जाण्याची शक्यता आहे. परंतु प्रतिस्पर्धी भाजप कोणाला रिंगणात उतरवते, ते पाहणे औत्सुक्याचे असेल.