मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी शिवसेना (Shivsena) सज्ज झाली आहे. आम्ही ‘करून दाखवले’ या मथळ्याखाली विकासकामां (Development Works)ची मोठी यादी मतदारांपुढे सादर करीत शिवसेनेने महापालिकेच्या सत्तेची चावी आपल्या हाती घेण्याचा चंग बांधला आहे. शहर आणि उपनगरांतील काही वॉर्ड हे आपले हुकुमी अर्थात सुरक्षित मतदारसंघ म्हणून शिवसेनेने त्या वॉर्डांकडे पाहिले आहे. वॉर्ड क्रमांक 180 हा देखील शिवसेनेच्या त्याच सुरक्षित मतदारसंघां (Election Wards)पैकी एक मानला जातो. मागील 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेच्या स्मिता शरद गावकर यांनी येथील चांगल्या मताधिक्याने विजय मिळवला होता. मतदारांनी दिलेली संधी आणि त्यांनी दाखवलेला विश्वास स्मिता गावकर यांनी मुंबई महापालिकेत आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला. त्यांच्या कर्तृत्वाची शिवसेनेला पुन्हा सत्तेत येण्याकामी मोठी मदत होईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्याचवेळी विरोधी बाकावरील भाजपची समीकरणे किती प्रभावी ठरतात, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वॉर्ड 180 हा वडाळा आरटीओ, विजयनगरचा प्रभाग आहे. या वॉर्डमध्ये वडाळा आरटीओ, विजयनगरसह म्हाडा ट्रांझिड कॅम्प, वडाळा ट्रॅक, चांदणीनगर, प्रियदर्शनी विद्यामंदीर ज्यूनियर कॉलेज, आदर्श स्कूल, दोस्ती आर्केड, संगमनगर, शिवशंकर नगर, गणेश नगर या प्रमुख ठिकाणांचा अंतर्भाव होतो. या वॉर्डाच्या उत्तरेला वॉर्ड क्रमांक 175 (भरणी नाका ते शेख मिस्त्री रोड), पूर्वेला वॉर्ड क्रमांक 181 (वीर अब्दुल हमीद मार्ग), दक्षिणेला वॉर्ड क्रमांक 181 (सागर) आणि पश्चिमेला वॉर्ड क्रमांक 179 (विद्यालंकार कॉलेज मार्ग) या प्रभागांची सीमा लागते.
पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
---|---|---|
शिवसेना | स्मिता शरद गावकर | स्मिता शरद गावकर |
भाजप | बिंदू यादव | - |
राष्ट्रवादी काँग्रेस | डॉ. कुरेशी साबिका मोहम्मद हसन | - |
काँग्रेस | वैशाली धर्मेद्र पाठक | - |
मनसे | तेजस्विनी रमेश नाक्ती | - |
अपक्ष / इतर | श्वेताताई कोकाटे | - |
2017 मधील सार्वत्रिक निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 180 मध्ये शिवसेनेच्या स्मिता शरद गावकर (Smita Gavkar) यांनी विजय मिळवला होता. त्यांनी भाजपचे बिंदू यादव (Bindu Yadav), काँग्रेसच्या (congress) वैशाली धर्मेंद्र पाठक (Vaishali pathak) आणि मनसेच्या (MNS) तेजस्विनी रमेश नाकती (Tejaswini Ramesh Nakti) यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरले होते. त्यावेळी शिवसेनेसोबत भाजपही सत्तेत होती. मात्र पालिकेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. यंदा दोन्ही पक्ष कट्टर प्रतिस्पर्धी बनून रिंगणात उतरणार आहेत, त्यामुळे यावेळची लढत अधिक चुरशीची पाहायला मिळणार आहे.
एकूण लोकसंख्या : 51808
अनुसूचित जाती (एससी): 2695
अनुसूचित जमाती (एसटी): 699
मागील निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 180 हा ओबीसी महिलांसाठी राखीव होता. या निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपले उमेदवार उभे केले होते. त्यावेळी रिंगणात उतरलेले उमेदवार व त्यांचा पक्ष पुढीलप्रमाणे :-
1. स्मिता शरद गावकर (शिवसेना) – विजयी
2. तेजस्विनी रमेश नाक्ती (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)
3. वैशाली धर्मेद्र पाठक (काँग्रेस)
4. डॉ. कुरेशी साबिका मोहम्मद हसन (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
5. बिंदू यादव (भारतीय जनता पार्टी)
6. आरती मंगेश पाटील (भारतीय शेतकरी कामगार पक्ष)
7. श्वेताताई कोकाटे (अपक्ष)
8. शमशाद आदम कुरेशी (अपक्ष)