प्रदीप कापसे, मुंबई : आज देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) लोकसभेत साजरा करण्यात आला, मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे सामान्य जनतेच्या हिताचा अधिक विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर कृषी आणि शालेय शिक्षणाच्या बाबतीत सुध्दा चांगला निर्णय घेण्यात आला आहे. अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर अरविंद सावंत यांनी केंद्राच्या अर्थसंकल्पावरती (Nirmala sitaraman) जोरदार टीका केली आहे. भाजपचे निर्णय सामाजिक हिताचे नसून फक्त राजकीय हेतू समोर ठेवून घेतले असल्याची टीका अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केली आहे.
हा अर्थसंकल्प उद्याची निवडणूक तोंडासमोर ठेवून तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत भाजपच्या सरकारने सामान्याचं कंबरडं मोडलं आहे. त्याचबरोबर अनेक चांगल्या गोष्टी सामान्यांच्या हिताच्या घेतलेल्या नाहीत. त्याचबरोबर आजच्या अर्थसंकल्पात कर प्रणालीबाबत फक्त चांगला निर्णय घेतला असल्याचं अरविंद सावंत यांनी सांगितलं.
आज देशात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महागाई आणि बेरोजगारी आहे. परंतु आजच्या अर्थसंकल्पात आशादायी चित्र मात्र दिसत नाही. पुढच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने अर्थसंकल्प जाहीर केल्याची टीका अरविंद सावंत यांनी केली.