Sanjay Gaikwad : ‘चून चून के मारे जायेंगे, गिन गिन के मारे जायेंगे..!’ बुलढाण्याच्या राड्यानंतर आमदार संजय गायकवाड यांची धमकी

| Updated on: Sep 04, 2022 | 10:15 AM

बुलढाण्यामध्ये झालेल्या राड्यामध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी खुर्च्यांची तोडफोड करत कार्यक्रम उधळून लावण्यात आला. विशेष म्हणजे पोलिसांच्या समोरच हा सगळा राडा झाला होता. या संपूर्ण राड्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केलंय.

Sanjay Gaikwad : चून चून के मारे जायेंगे, गिन गिन के मारे जायेंगे..! बुलढाण्याच्या राड्यानंतर आमदार संजय गायकवाड यांची धमकी
संजय गायकवाड, शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

बुलढाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे (Eknath Shinde group) बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी आता धमकीच दिली आहे. शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा राडा शनिवारी झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना धमकावलंय. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पातळी सोडून बोलाल, तर चून चून के, गिन गन के मारे मायेंगे, असं म्हणत त्यांनी ठणकावलंय. शनिवारी बुलढाण्यात (Buldana Shiv sena Politics) जोरदार राडा झाला होता. एकनाथ शिंदे समर्थक आणि शिवसैनिक यांच्यामध्ये यावेळी पोलिसांसमोरच जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता आमदार संजय गायकवाड यांनी शिवसैनिकांना डिवचलंय.

बुलढाण्यामध्ये शनिवारी ठाकरे गटाचे नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या वेळी आमच्या नेत्यांवर टीका का करता?, असं म्हणत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. कुणाल गायकवाड आणि त्यांचे कार्यकर्ते शिवसेनेच्या कार्यक्रमाच्या स्थळी दाखल झाले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली होती.

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा

बुलढाण्यामध्ये झालेल्या राड्याआधी पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी खुर्च्यांची तोडफोड करत कार्यक्रम उधळून लावण्यात आला. विशेष म्हणजे पोलिसांच्या समोरच हा सगळा राडा झाला होता. या संपूर्ण राड्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केलंय. त्यामुळे बुलढाण्यातील राजकारण आता पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

पाहा बुलढाण्यातील राजकीय राड्याचा स्पेशल रिपोर्ट

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि खासदार प्रतापराव जाधव या दोघांनीही शिंदे यांना समर्थन दिलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची नव्याने नेमणूक केली होती. तर जुन्या पदाधिकाऱ्यांवरील जबाबदारी काढून घेत त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली होती. त्यानंतर बुलढाण्यातील स्थानिक राजकारण तापलंय.