सत्तास्थापनेच्या हालाचालींना वेग, पुणे, सातारा, सांगलीमध्ये मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात?

| Updated on: Oct 30, 2019 | 8:39 PM

पश्चिम महाराष्ट्रातून मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं (Ministry in western Maharashtra) आहे.

सत्तास्थापनेच्या हालाचालींना वेग, पुणे, सातारा, सांगलीमध्ये मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात?
Follow us on

पुणे : राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला (Ministry in western Maharashtra)  आहे. त्यात आता मंत्रिमंडळात नेमकी कोणाला संधी मिळणार याकडे महायुतीच्या विजयी उमेदवारांचे लक्ष लागलं आहे. भाजपचे सर्वाधिक लक्ष पश्चिम महाराष्ट्रात आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं (Ministry in western Maharashtra) आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात 2014 मध्ये भाजप सेनेने जोरदार मुसंडी घेतली होती. मात्र 2019 च्या विधानसभा निकालात पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पश्चिम महाराष्ट्र आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलं आहे.

पश्चिम महाराष्ट्रात एकूण 70 जागांचे विधानसभा संख्याबळ आहे. यात 2014 मध्ये भाजप 24, शिवसेना 13, काँग्रेस 10, राष्ट्रवादी 19 तर इतर 04 जागांवर बाजी मारली होती. यंदाच्या निवडणुकांमध्ये भाजप 18, शिवसेना 10, काँग्रेस 9 आणि राष्ट्रवादीने 25 जागांवर विजय मिळवला (Ministry in western Maharashtra) आहे.

त्यामुळे महायुतीच्या सरकारमध्ये नेमकी मंत्रिपदासाठी कोणाची वर्णी लागणार, कोणाचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यानुसार जिल्हानिहाय महायुतीच्या या उमेदवारांना कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदी संधी मिळण्याची शक्यता आहे.

जिल्हानिहाय मंत्रीपदी नेमकी कुणाची वर्णी लागणार ?

जिल्हा युतीचे आमदार
   
पुणे 1. चंद्रकांत पाटील (कोथरुड)
  2. माधुरी मिसाळ (पर्वती)
  3. राहुल कुल (दौंड)
   
सातारा 4. शिवेंद्रराजे भोसले (सातारा-जावळी)
  5. जयकुमार गोरे (माण)
  6. शंभूराजे देसाई (पाटण) (शिवसेना)
   
सांगली 7. सुधीर गाडगीळ (सांगली शहर)
  8. अनिल बाबर (खानापूर) (शिवसेना)
   
नगर 9. राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी)
  10. बबनराव पाचपुते (श्रीगोंदा)

संबंधित बातम्या :

सेनेची महत्त्वाची बैठक, जे जे शक्य होईल, ते सर्व करणार, उद्धव ठाकरेंचं सूचक विधान

शिवसेना-भाजपच्या 6 दिग्गजांचा मंत्रिपदावर डोळा, औरंगाबादमधून कुणाची वर्णी लागणार?