चेन्नई : भाजपने राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील सत्ता गमावल्यानंतर मोदी लाट ओसरल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे या तापलेल्या राजकीय वातावरणात योगगुरु रामदेव बाबा यांनी एक वक्तव्य केलं आहे. पुढचा पंतप्रधान कोण असेल हे सांगणं कठीण असल्याचं रामदेव बाबा म्हणाले. तामिळनाडूतील मदुरईमध्ये त्यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रश्न विचारण्यात आला होता.
राजकीय परिस्थिती कठीण आहे. पुढचा पंतप्रधान कोण हे सांगता येणार नाही. मी राजकारणावर लक्ष केंद्रीत करत नाही. ना कुणाचं समर्थन करतो, ना कुणाचा विरोध, अशी प्रतिक्रिया रामदेव बाबा यांनी दिली. वाचा – राहुल गांधींचं नेतृत्त्व पवारांनाही मान्य, विरोधकांची मोट बांधण्याचा विडा उचलला
भारताला धार्मिक किंवा हिंदू बनवणं हे आपलं लक्ष्य नाही. भारत आणि हे जग अध्यात्मिक झालं पाहिजे, असंही रामदेव बाबा म्हणाले. सध्याची देशातील राजकीय परिस्थिती आणि रामदेव बाबा यांच्या वक्तव्याला जोडलं जात आहे. मोदी सरकारच्या योजनांची पाठराखण करणाऱ्या रामदेव बाबांनाच मोदींच्या 2019 मधील विजयाची शाश्वती नसल्याचं दिसतंय. वाचा – लोकसभा निवडणुकीत केसीआर काँग्रेसप्रणित महाआघाडीचा खेळ बिघडवणार?
रामदेव बाबा सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक मुद्द्यांवर दिलखुलास प्रतिक्रिया देत असतात. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर हिंसाचारानंतर अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी आपलं मत मांडलं होतं. भारतात जेवढी सहिष्णुता आहे, तेवढी जगातल्या दुसऱ्या कोणत्याही देशात नाही, असं ते म्हणाले होते. वाचा – Loksabha 2019 : आज निवडणुका झाल्यास महाराष्ट्रात भाजपचा सुपडासाफ : सर्व्हे
भाजपविरोधात महाआघाडी आणि तिसरी आघाडी
काँग्रेसने महाआघाडीची घोषणा करत देशभरातील भाजपच्या विरोधात असणाऱ्या विविध पक्षांना एकत्र आणण्याचं काम सुरु केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी घेतली आहे. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही प्रादेशिक पक्षांना एकत्र आणत तिसरी आघाडी उघडण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.